जम्मूमध्ये आढळले ड्रोन, हाय अलर्ट जारी

जम्मू : जम्मूमधील (jammu) एअरबेसवर रविवारी झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर पुन्हा सोमवारी पहाटे तीन वाजता मिलिट्री स्टेशनवर ड्रोन आढळून आले. लष्काराच्या निदर्शनास येताच त्यांनी २० ते २५ राऊंडची फायरिंग केली. त्यानंतर हे ड्रोन (drone) गायब झाले असून परिसरात लष्कराकडून शोध मोहिम राबविण्यात येत आहे.

jammu kaluchak military station drone spotted army jawans fired

दरम्यान, दहशतवाद्यांनी आता ड्रोनच्या (drone) माध्यमातून सैन्य तळांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न करत असल्याचे समोर येऊ लागले आहे. दरम्यान, ज्या भागात हे हल्ले करण्यात आले त्या परिसरात अनेक महत्त्वाची कार्यालयं आहेत. जम्मूच मुख्य विमानतळदेखील याच भागात आहे. त्यामुळे सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जम्मूच्या सतवारी परिसरात असणाऱ्या एअरफोर्सबेसवर रविवारी दोन ड्रोन (drone) हल्ले करण्यात आले. या ड्रोनद्वारे (drone) आयइडी टाकण्यात आले असून यामध्ये दाने बॅरेक्सचे नुकसान झाल. पाच मिनिटांच्या फरकाने दोन स्फोट झाल्याचे सांगण्यात येत असून रविवारी जम्मूच्या सतवारी परिसरात एअऱफोर्स बेसवर दोन ड्रोन (drone) हल्ले करण्यात आले.पहिला स्फोट रात्री १.३७ वाजात एका इमारतीच्या गच्चीवर झाल.

Pune Crime News | पुण्यात तरूणीनं व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून तरूणाचा रेकॉर्ड केला नग्नावस्थेतील व्हिडीओ, उकळले पैसे

तर दुसरा १.४२ वाजता स्फोट जमिनीवर झाला. जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक
दिलबाग सिंह यांनी या हल्ल्यांमागे जैश-ए-मोहम्मद किंवा लष्करी-ए-तोयबा या संघटनांचा हात
असण्याची शक्यता वर्तवली आहे. या घटनेनंतर सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आल आहे.
त्याबरोबर महत्वाच्या ठिकाणांची सुरक्षाही वाढवली आहे.

ड्रोनचा वापर कसा झाला? (How was the drone used?)

काही दिवसांपूर्वी भारतीय सुरक्षा यंत्रणांना जैश ए मोहम्मदने हिज्बुल मुजाहिदीनची मदत घेत पाकिस्तानमधून भारतात छुप्या पद्धतीने ड्रोन आणल्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी ५ ते ६ किलो वजनाचा एक आयईडीदेखील पोलिसांनी जप्त केला. होता. दरम्यानच्या काळात छुप्या मार्गाने जम्मू काश्मीर परिसरात ड्रोन (drone) बनवण्याचं सुट्टं साहित्य आणून त्याचा वापर हा हल्ल्यासाठी केला असावा, असा संशय जम्मू काश्मीर पोलिसांनी (Jammu and Kashmir Police) व्यक्त केला आहे. आहे. पोलीस सध्या त्या दिशेने तपास करत आहेत.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : jammu kaluchak military station drone spotted army jawans fired

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update