Jammu Kashmir 2 Terrorists Surrendered | काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलाच्या जवांनाची मोठी कारवाई; 2 दहशतवाद्यांचं आत्मसमर्पण

जम्मू काश्मीर : वृत्तसंस्था – Jammu Kashmir 2 Terrorists Surrendered | जम्मू काश्मीरच्या (Jammu-Kashmir) कुलगाममध्ये (Kulgam) भारतीय जवानांचे (Indian Army) मोठं ऑपरेशन सुरु आहे. हादीगाम परिसरात सैन्य दलाचे जवान आणि पोलिसांची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीमध्ये यावेळी 2 दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण (Jammu Kashmir 2 Terrorists Surrendered) केलं आहे. दोन दहशतवादी शरण गेल्याने सैन्य दलाच्या जवानांना मोठं यश मिळाले आहे.

पोलिसांनी आवाहन केल्यानंतर दोन्ही दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. या 2 दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. सैन्य दल आणि पोलिसांनी स्पेशल इंटेलिजेंसकडून माहिती मिळाल्यानंतर जवानांनी ऑपरेशन सुरु केले. पोलिसांनी हादीगाम परिसरात दहशतवादी लपलेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सैन्य दलाचे जवान आणि पोलिसांनी या परिसराला घेराव घातला. अशी माहिती सैन्य दलाकडून समोर आली आहे.

 

दरम्यान, मागील महिन्यात जम्मू आणि काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना पुढे आल्या होत्या. यानंतर सैन्य दलाने मोठी कारवाई केली होती. जवानांनी अनेक दहशतवादी संघटनांचे कमांडर आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. यंदा 2022 मध्ये जुलै महिन्यापर्यंत भारतीय सैन्यांनी 130 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या दरम्यानच्या काळामध्ये 20 स्थानिक नागरिक आणि 19 जवानांचा मृत्यू झाला असल्याचे समजते.

 

Web Title :- Jammu Kashmir 2 Terrorists Surrendered | jammu kashmir major army operation in kulgam jammu and kashmir 2 terrorists surrendered

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Rain Update | राज्यात आगामी 5 दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज; मुंबईसह पुण्यात मुसळधार, कोल्हापुरात ‘धो-धो’

 

Former Mumbai CP Sanjay Pandey | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे चौकशीसाठी ‘कॅब’ने ED कार्यालयात

 

Pune PMC News | निविदा मंजुरीनंतर 6 महिन्यांत वर्क ऑर्डर न दिल्यास खातेप्रमुखांवर कारवाई; महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार यांचा आदेश

 

Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई

 

 

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात खायला सुरूवात करा ‘या’ 5 गोष्टी, वृद्धत्वापर्यंत शरीरात शीरणार नाही कोलेस्ट्रॉल

 

PM Kisan Yojana | PM किसान सन्मान निधीच्या 12 व्या हप्त्याबाबत मोठी माहिती; आधी ‘हे’ काम करा पूर्ण

 

LPG Cylinder Price Hiked | सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ! घरगुती LPG सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ; जाणून घ्या दर