जम्मू-काश्मीर: चकमकीत अकरा दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर: वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी शोध मोहीम राबवणाऱ्या सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. अनंतनाग आणि शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत अकरा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. तर एक दहशतवादी जिवंत पकडण्यात आला. तो हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी असल्याचे सांगण्यात येत आहे.
अनंतनाग आणि शोपियानमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी अनंतनागमध्ये शोध मोहीम सुरू केली.