अमरनाथ यात्रा मध्येच थांबवली, पर्यटकांना देखील काश्मीरचं खोरं सोडण्यास सांगितलं

वृत्‍तसंसथा – जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे. संभावित धोक्यांमुळे आणि दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभुमीवर राज्य सरकारने सचूना देऊन अमरनाथ यात्रा थांबविली आहे. यात्रेकरूंना परत जाण्यास देखील सांगण्यात आले आहे. दरम्यान, अमरनाथ यात्रेच्या मार्गावर सुरक्षा यंत्रणेच्या जवानांना स्नायपर रायफल मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
https://twitter.com/ANI/status/1157251061142437888/photo/1

जम्मू-काश्मीर सरकारच्या गृह विभागाने जारी केलेल्या सूचनेनुसार अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे इनपुट मिळाले आहेत. काश्मीरची सुरक्षा वाढविण्यामागे आणि अमरनाथच्या यात्रेकरू तसेच पर्यटकांच्या सुरक्षाच्या दृष्टीकोनातूनच सध्या काश्मीरमधील सर्व यात्रा स्थगित करण्यात आल्या आहेत.

अमरनाथच्या यात्रेकरूंना सांगण्यात आले आहे की त्यांनी तात्काळ त्यांची यात्रा संपवावी आणि लवकरात लवकर काश्मीरचं खोरं सोडून जावे. मोठया दहशतवादी हल्ल्याचं इनपुट मिळाल्यानं ही पावलं उचलण्यात आली आहेत. दरम्यान, अमरनाथ यात्रा 15 ऑगस्ट पर्यंत चालणार होती मात्र आता ती स्थगित करण्यात आली आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त