जम्मू-कश्मीरमध्ये ‘ईद’ शांततेत साजरी, ‘व्हिडीओ’मध्ये पहा आकाशातून कसा दिसतो कश्मीरचा ‘नजारा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधूल कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर तेथे कलम १४४ लागू करण्यात आले होते. पंरतू आज संचार बंदी शिथिल करण्यात आली असून काश्मीर खोऱ्यात आज शांततेत ईद साजरी केली जात आहे. सध्या लोकांचे जीवन काही अर्थी सुरळीत झाले आहे. बाजारपेठ, एटीएम सुरु करण्यात आले आहेत. ईद निमित्त आज नमाज पठनासाठी सूट देण्यात आली होती. ईदीच्या सणानिमित्त कलम १४४ शिथिल करण्यात आले आहे. लोक नमाज पठनासाठी मस्जिदमध्ये जात आहेत. असे असले तरी नमाजाची वेळ संपल्यावर पुन्हा कलम १४४ लागू करण्यात येईल.

खोऱ्यात सैन्य तैनात –

सोमवारी श्रीनगरच्या विकास अधिकारी शाहिद चौधरी यांनी हवाई पाहणी केली आणि परिस्थितीची माहिती दिली. जम्मू काश्मीर पोलीस, सुरक्षा दल श्रीनगर, बडगाम, अनंतनाग सह संपूर्ण काश्मीर खोऱ्यात तैनात आहेत.

सैन्याकडून मिठाई वाटप –

सोमवारी सकाळी खोऱ्यातील लोक मस्जिदीकडे मोठ्या संख्येने बाहेर पडले आणि त्यांनी नमाज पठन केले. जम्मू काश्मीर मध्ये सैनिकांनी मस्जिदीच्या बाहेर लोकांना मिठाई वाटली आणि स्थानिकांना ईदीच्या शुभेच्छा दिल्या. पोलिसांनी सांगितले की, खोऱ्यात मागील ६ दिवसापासून छोट्या छोट्या समस्या सोडून कोणतीही मोठी घटना घडलेली नाही. शांतता आहे आणि कोणतीही गोळीबार झाल्याची घटना घडली नाही.

अजित डोभाल यांची साधला सामान्य नागरिकांशी संवाद –

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल मागील आठवड्यापासून खोऱ्यातच आहे. ते विविध भागात जाऊन सुरक्षेच्या परिस्थितीची पाहणी करत आहेत. आज देखील ईद निमित्त डोभाल विविध भागात गेले आणि अनेक लोकांची भेट घेतली. त्यांनी ईद निमित्त श्रीनगरच्या डाऊनटाऊन, सोपोर, लाल चौक या भागांची दौरा केला आणि सामान्यांशी संवाद साधला.

आरोग्यविषयक वृत्त –