‘काश्मीर’च्या ‘पंच-सरपंच’ यांना मिळणार 2 लाखाचा ‘विमा’, अमित शाहांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने घोषणा केली आहे की जम्मू काश्मीरमधील पंच सरपंचांना 2 – 2 लाख रुपयांंचा विमा देण्यात येईल. गृहमंत्री अमित शाह यांना मंगळवार काश्मीरच्या 22 गावातील पंच आणि सरपंचाची भेट घेतली. हे तेच लोक आहेत ज्यांना दहशतवाद्याकडून सतत धमक्या देण्यात येतात तरीही त्यांनी निवडणूक लढली. या बैठकीत इतर अधिकारी देखील सहभागी झाले होते.

दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर अमित शाह यांनी काश्मीरी डेलिगेशनला आश्वासन दिेले की काश्मीर खोऱ्यात पुढील दोन आठवड्यात मोबाइल इंटरनेट सेवा सुरळीत सुरु करण्यात येईल.

काश्मीरी डेलिगेशनलने अमित शाहांची भेट घेतली त्यावेळी या भेटीत दावा करण्यात आला की जम्मू काश्मीरमधील सरपंच आता अधिक मजबूत होतील. कलम 370 रद्द केल्यानंंतर 73 घटनादुरुस्ती लागू करण्यात आली होती. तसेच या चर्चेनंतर पंच आणि सरपंचांना दोन लाखाच्या विम्याची घोषणा करण्यात आली.