कलम ३७० वरून आता रशियाचा पाकिस्तानला ‘दणका’, भारताने घेतलेला निर्णय संविधानाला ‘धरून’च

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – जम्मू काश्मीर संदर्भात भारताने घेतलेल्या निर्णयाचे रशियाने स्वागत केले आहे. रशियाच्या  विदेश मंत्रालयाने म्हटले आहे कि, काश्मीरच्या विभाजनाचा भारताने घेतलेला हा निर्णय संविधानाला धरूनच घेतला आहे. त्याचबरोबर रशियाला आशा आहे कि, काश्मीरच्या या मुद्द्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता पसरणार नाही.

पुढे बोलताना रशियाच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे कि, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आपापसांत या मुद्द्यावर निर्णय घेण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर हा मुद्दा या दोन्ही देशांमधील वाद वाढण्यास कारणीभूत ठरणार नाही अशी आशा आम्ही करतो. रशियाबरोबरच चीनने देखील भारत आणि पाकिस्तानने या वादाला सोडवण्यासाठी चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. कलम ३७० वर अप्रत्यक्षपणे भाष्य करताना चीनने म्हटले कि, अशा प्रकारे एकतर्फी निर्णय घेऊन तणावाला दिशा देण्याचे काम करू नये. त्याचबरोबर शांततेला प्राधान्य देण्यात यावे.

दरम्यान, भारताने पाकिस्तानच्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना भारताच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार  यांनी म्हटले होते कि, भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला भीती वाटत आहे कि, या निर्णयामुळे आता त्यांना काश्मिरींना भडकावून दहशतवादी हल्ले करता येणार नाहीत त्याचबरोबर काश्मिरी नागरिकांना आता ते आपल्या बाजूने वळवू शकत नाहीत.

आरोग्यविषयक वृत्त