भाजपचे नेते अनिल परिहार आणि त्यांच्या भावाची हत्या

श्रीनगर : वृत्तसंस्था – भाजपचे राज्य सचिव अनिल परिहार आणि त्यांच्या भावाची जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हे दोघे त्यांच्या दुकानातून घरी येत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर किश्तवाडमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

हल्लेखोरांनी अनिल परिहार आणि त्यांच्या भावावर गोळ्या झाडल्या ते त्यांच्या पाळतीवर होते त्यांच्या परतण्याची वाटच बघत होते. दोघांनाही जखमी अवस्थेत रूग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तिथे मृत घोषित केले.

वडिलांना केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी केला खुन 

परिहार यांचा भाऊ सरकारी कर्मचारी होता. दोघेजण तपन गल्ली भागात आले असता त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. सुरक्षा रक्षकासमोर हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हा हल्ला दहशतवाद्यांनी केला असावा अशी शंका असून त्यादृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत. हल्ला झाला तेव्हा परिहार यांचे सुरक्षा रक्षक कुठे होते याचाही शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, भाजपचे नेते अशोक कौल यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून अनिल परिहार आणि त्यांच्या भावाच्या हत्येचे वृत्त धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत, अशा भावना राजनाथ सिंह यांनी व्यक्त केल्या आहेत.

जाहिरात