राहुल गांधींच्या श्रीनगर भेटीस प्रशासनाचा ‘रेड सिग्नल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी श्रीनगरला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आता यासंबंधी ताजे वृत्त समोर आले असून जम्मू-काश्मीर प्रशासनाने त्यांच्या श्रीनगर भेटीस परवानगी नाकारली आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाने म्हटले आहे की विरोधी नेत्यांनी काश्मीरमध्ये न येऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे.

आम्ही लोकांना दहशतवाद्यांपासून वाचविण्यात गुंतलो असून नेत्यांच्या भेटीमुळे गैरसोय होईल, असे प्रशासनाने ट्विट केले आहे. प्रशासनाने म्हटले आहे की नेत्यांनीदेखील त्या निर्बंधांचे उल्लंघन करणे टाळले पाहिजे, जे अजूनही काश्मीरच्या बर्‍याच भागात लागू आहेत. शांतता, सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आणि हानी टाळण्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता दिली जाईल हे वरिष्ठ नेत्यांनी समजले पाहिजे.

दरम्यान, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी उद्या जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरला भेट देणार असून राहुल यांच्यासह विरोधी पक्षातील इतर ९ नेतेही श्रीनगरला जाणार आहेत. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदा जम्मू काश्मीरला रवाना होतील. ही माहिती राहुल यांनी ट्विटर वरून दिल्यानंतर काही वेळातच जम्मू काश्मीर प्रशासनाने त्यास रेड सिग्नल दाखवला आहे.

गुलाब नबी आझाद देखील दोनदा विमानतळावरून परतले :
कलम ३७० हटवल्यानंतर, कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद दोनदा जम्मू काश्मीरला गेले होते. परंतु त्यांना प्रथम श्रीनगर विमानतळावरून आणि नंतर जम्मू विमानतळावरून दिल्लीला परत जावे लागले. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा कलम ३७० काढून टाकल्यानंतर, विरोधी पक्ष केंद्र सरकारवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी व संचारबंदी आणण्यासाठी सातत्याने टीका करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –