काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठं यश, ‘त्राल’मध्ये मारला गेला ‘कमांडर’ जाकिर मूसाचा ‘उत्तराधिकारी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यां विरोधात लष्कराने मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी त्राल येथे झालेल्या चकमकीत दहशवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. गजवत उल हिंदच्या हामिद लल्हारीला लष्कराने यामध्ये ठार केले आहे. हामिद लल्हारीने जाकीर मुसा नंतर या खतरनाक संघटनेचे नेतृत्व स्वीकारले होते.

बुधवारी डीजीपी दिलबाग सिंह यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले हे तीनही स्थानिक दहशतवादी होते.

दिलबाग सिंह ने सांगितले की, जाकीर मुसा नंतर या संघटनेचे नेतृत्व हामिद लल्हारी करत होता यासाठी त्याने अनेक हालचाली सुरु केल्या होत्या. तसेच जैश मोहम्मद संघटनेकडून खोऱ्यांमध्ये दहशदवादी कारवाया सुरु असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

कोण होता हामिद लल्हारी ?
हामिद लल्हारी कडे आता गजवत उल हिंदची कमान होती. त्याने काश्मीरमधील तरुणांची भरती आपल्या या संघटनेमध्ये करायला सुरुवात केली होती. हामिद लल्हारी 2016 मध्ये सक्रिय झाला होता. पुलवामा हल्ल्याच्या वेळी देखील तो सक्रिय होता. 2017 मध्ये काश्मीरमधील दहशतवादाचा तो मुख्य म्होरक्या बनला.

दिलबाग सिंह यांनी यावेळी पुन्हा एकदा काश्मीरमधील तरुणांना दहशतवादासोबत न जाण्याचे आवाहन केले आहे.त्यांनी सांगितले की जे लोक पाकिस्तानच्या इशाऱ्यांवर चुकीच्या मार्गाने चालत आहेत त्यांनी योग्य मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी हे देखील सांगितले आहे की आता तरुण दहशतवाद्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

Visit : Policenama.com

You might also like