जम्मू काश्मीरच्या भूमीत ‘फडकला’ भारताचा ‘तिरंगा’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये अखेर भारताचा तिरंगा आज आभिमानाने फडकत आहे. जम्मू कश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले. अखेर बुधवारी जम्मू कश्मीरमध्ये भारताचा तिरंगा फडकला. श्रीनगरमधील नागरी सचिव कार्यालयावर आज भारताचा तिरंगा फडकविण्यात आला.

जम्मू काश्मीरसाठी आतापर्यंत स्वतंत्र संविधान आणि झेंडा होता. मात्र कलम ३७० आणि कलम ३५ A रद्द करण्यात आल्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये भारताचा झेंडा फडकवण्यात आला.

जम्मू काश्मीरच्या राज्य सरकारकडून १५ ऑगस्टला आणि २६ जानेवारीला जम्मू काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा फेडकवण्यात येत नसत. आता जम्मू काश्मीरमध्ये हे कलम रद्द केल्यानंतर राष्ट्रध्वज फडकवन्यात आला. सरकारच्या या निर्णयानंतर देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. आज जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये नागरी सचिव कार्यालयावर तिरंगा फडकवला.

आरोग्यविषयक वृत्त