पाकिस्तानच्या कुरापती सुरूच ; काश्मीरमध्ये आयईडीचा स्फोट

श्रीनगर : वृत्तसंस्था – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानचे संबंध अधिकच ताणले गेले आहेत. पाकिस्तान एकीकडे शांततेची मागणी करत आहे तर दुसरीकडे सीमेवर पाकचे सैन्य भारतीय सैन्यावर गोळीबार करत आहे. अशा सर्व युद्धजन्य परिस्थितीमध्ये काश्मीरच्या त्रालमध्ये आयईडी स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे समजते मात्र या स्फोटात एक घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.

राजकीय फायद्यासाठी युद्धाचे भांडवल ; राज्यातील ‘या’ बड्या नेत्याचा मोदींवर घणाघात

स्फोट झाला तेव्हा लोक मानवी वस्तीपासून दूर असल्याने या स्फोटात कोणतीही जीवित हानी झाली नाही. त्रालमध्ये रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडून लष्कराच्या गाडयांना अडथळा निर्माण करण्याच्या प्रयत्नांत दहशतवादी होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच त्याचे फोटो देखील माध्यमांच्या हाती लागले आहेत.

जम्मू काश्मीर मधील दहशतवादी आणि फुटीरतावादी पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्यांच्या कडून नेहमीच लष्कराच्या गाड्यांना लक्ष करण्याचे प्रयत्न होत आहेत अशी माहिती गुप्तचर संस्थेकडून देण्यात आली आहे. दरम्यान पुलवामा येथील जिल्हा रुग्णालयाला लागून असणाऱ्या जमात ए इस्लामीच्या कार्यालयाला पोलीसांनी सील केले आहे.