PAKची माहिती पहिल्यांदाच ‘खरी’ ठरली ; पुलवामामध्ये लष्कराच्या ताफ्यावर हल्‍ला, स्फोटासाठी ‘IED’चा वापर

पुलवामा (जम्मू-काश्मीर) : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर IED ने स्फोट घडवून आणला आहे. यामध्ये लष्कराच्या ४४ राष्ट्रीय रायफल्सला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामध्ये पाच जवान जखमी झाले तर एका दहशतवाद्याचा मृत्यू झाला आहे. जखमी जवानांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लष्कराचे जवान गाडीतून जात असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला. हा हल्ला पुलवामा येथील अरिहल गावातील लस्सीपुरा रोडवर करण्यात आला. यावेळी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

हल्ल्यापूर्वी एक दिवस अगोदर अलर्ट देण्यात आला होता. यानंतर लष्कराला तैनात राहण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. पाकिस्तानने पुलवामा मध्ये हल्ला होणार असल्याची माहिती भारताला आणि अमेरिकेला दिली होती. हा हल्ला दहशतवादी जाकिर मूसाच्या हत्येचा बदला करण्यासाठी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. लष्कराला हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराच्या जवानांना बंदोबस्त वाढवण्यास सांगण्यात आले होते. पोलिसांनी जम्मू आणि काश्मीर राज्यमार्गावर विशेष बंदोबस्त ठेवला होता.

दहशतवाद्यांकडून पुलवामा येथे IED चा हल्ला होऊ शकतो असे भारत आणि अमेरिकेला पाकिस्ताने काल सांगितले होते. पाकिस्तानने दिलेल्या माहितीवरून जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. १४ फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी मोठा आत्मघातकी हल्ला केला होता. हा हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांनी कारचा वापर केला होता.

आरोग्यविषयक वृत्त

बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’, ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’साठी देखील फायदाच

#YogaDay2019 : नियमित योगा करा…आणि स्मरणशक्ती वाढवा

“संधिवात” बरा करायचा असेल तर पाळा हे पथ्य