Jammu & Kashmir | नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानची घुसखोरी हाणून पाडली; BSF ने केला दोघांचा खात्मा, 36 किलो ड्रग्स जप्त

श्रीनगर : वृत्तसंस्था – Jammu & Kashmir | जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये (Samba Sector) शनिवारी रात्री भारतात (India) घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या (Pakistan) दोघांचा खात्मा सीमा सुरक्षा दलांच्या (Border Security Forces) जवानांनी केला. दरम्यान, पाकिस्तानचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळालं असून ठार केलेल्यांकडून बीएसएफने 36 किलो ड्रग्ज जप्त (Seized Drug) केले आहे. जम्मू काश्मीर मधील (Jammu & Kashmir) या घटनेनंतर या परिसरात बीएसएफने (BSF) शोधमोहीम राबवली आहे.

 

एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना दहशतवादी (Terrorist) लपल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार शनिवारी रात्री जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu & Kashmir) जाकुरा भागात (Jakura Area) सुरक्षा दलांनी शोध मोहीम राबवली. ही शोध मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार (Firing) सुरू केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिले. त्यात लष्कर-ए-तैयबाचे (Lashkar-e-Taiba) दोन दहशतवादी ठार झाले.

 

एक पाकिस्तानी मच्छीमार ताब्यात
भारत-पाकिस्तान सागरी सीमेवर गस्त घालताना ३१ जानेवारीला बीएसएफने गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील (Kutch District Gujarat) खाडी प्रदेशातून एका पाकिस्तानी नागरिकाला पकडले होते. त्याचबरोबर मासेमारी करणाऱ्या तीन नौकाही जप्त केल्या होत्या. तर आखाती प्रदेशात (Gulf Region) चार मच्छिमार बीएसएफच्या गस्ती नौका पाहून पाकिस्तानच्या हद्दीत पळून गेले होते.

 

ड्रोन जागरुकता कार्यक्रम
भारत-पाक सीमेवर सीमा सुरक्षा दलाने ड्रोन संबंधित विविध पैलूंबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी 140 हून अधिक ड्रोन जागरुकता कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानला लागून असलेल्या 198 किमी लांबीच्या सीमेवर राहणारे लोक शेजारील देशाकडून ड्रोन (Drone) घुसखोरीवर नजर ठेवण्यासाठी बीएसएफला मदत करत आहेत. दरम्यान,ड्रोन जनजागृती करणारे अनेक फ्लेक्स बोर्डदेखील आंतरराष्ट्रीय सीमेवरील (International Border) आरएस पुरा, अखनूर आणि अरनिया सेक्टरमधील सीमावर्ती वस्त्यांत लावले गेले आहेत.

 

Web Title :- Jammu & Kashmir | jammu and kashmir bsf kills three pakistani infiltrators seizes 36 kg of drugs

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kirit Somaiya In Pune | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी 8 शिवसैनिकांविरोधात FIR

 

Gangubai Kathiawadi | ‘गंगुबाई काठियावाडी’ मध्ये विजय राज साकारणार ‘रजिया बाई’ हे पात्र, पात्रामुळं सोशल मीडियावर रंगला वाद-विवाद; नेटकरी म्हणाले – ‘Trans ला संधी का नाही?’

 

Lata Mangeshkar | 2 वर्षापासून गाठीभेटी टाळल्या, घराच्या बाहेरही पडल्या नाहीत, मग लतादीदींना कोरोनानं कसं गाठलं? जाणून घ्या