J&K मध्ये भीषण अपघात ; मिनी बस दरीत कोसळून ३३ यात्रेकरू ठार तर १३ जखमी

जम्मू काश्मीर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर मधील किश्तवाड मध्ये आज सकाळी सगळ्यात मोठा अपघात झाला. केशवन येथे भक्तांनी भरलेली मिनी बस अनियंत्रणामुळे खोल दरीत कोसळल्याने ३३ जणांचा मृत्यू झाला, तर १३ लोक जखमी आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटना स्थळी पोलीस आणि रेस्क्यू टीमने बचाव कार्य सुरु केले आहे. ही घटना आज सोमवार सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.

जखमींना जवळील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरु आहेत. घटनास्थळी पोलिसांसोबतच स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी हाथ पुढे केला आहे. घटनास्थळी पोलिसांनी वेळेवर उपस्थित राहिल्याने जखमी नागरिकांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. बसमध्ये अडकलेल्या काही लोकांनाही बाहेर काढण्यात आले. अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु आहे.

आज सकाळी मिनी बस JK१७- ६७८७ केशवन कडून किश्तवाड येथे निघाली असताना श्रीगिरी येथे सकाळी ८ सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बसच्या अनियंत्रणामुळे बस रस्त्यावरून घसरल्याने खोल दरीत कोसळली. स्थानिक नागरिकांच्या मते बस ओव्हर लोड झाल्याने हा अपघात झाला आहे. पोलिसांचे पहिले पथक मदत कार्यासाठी सज्ज आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

शाकाहारीं नो, पौष्टिकतेवर लक्ष द्या ; प्रोटिनयुक्त पदार्थ शरीराला आवश्यक

शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत चिकित्सा ठरते उपयोगी

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

 ‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

 ‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर