J&K ची 62 वर्ष जुनी ‘विधान परिषद’ बरखास्त, 31 ऑक्टोबरपासून होणार ‘केंद्रशासित प्रदेश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर पुनर्गठन कायदा कलम 57 अंतर्गत विधान परिषदेला सरकारने बरखास्त केले आहे. परिषदेच्या 116 कर्मचाऱ्यांना 22 ऑक्टोबरला सामान्य प्रशासनिक विभागाला रिपोर्ट करण्यास सांगण्यात आले.

31 ऑक्टोबरला जम्मू काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्याच्या आधी राज्य सरकारने 62 वर्ष जुनी विधान परिषद समाप्त केली. या संंबंधित आदेश प्रशासकीय विभागाने बुधवारी रात्री उशीरा आदेश जारी केले.

आदेशांतर्गत विधान परिषदेसाठी खरेदी केलेली वाहनांना स्टेट मोटर गॅरेजच्या निदेशकांना हस्तांतरित करण्यात येईल. याच प्रकारे विधान परिषदेचे सचिव परिषदेच्या भवन आणि फर्निचर व इलेक्ट्रॉनिक उपकरणांना एस्टेट विभागाकडे जमा करण्यात आले आहे. याशिवाय परिषदेचे सचिवांना कौन्सिल सचिवालयच्या सर्व रेकॉर्डला कायदा, न्याय आणि संसदीय प्रकरणांच्या विभागाला हस्तांतरित करण्यात आले आहे.

उल्लेखनीय हे आहे की 36 सदस्यांची क्षमता असलेल्या विधानसभेत 22 सदस्य होते, यात 10 भाजपचे, 8 पीडीपीचे, 3 नॅशनल कॉन्फरंसचे आणि 1 काँग्रेसचे सदस्य सहभागी होते.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like