होय, आपल्या भारतात ! ‘लॉकडाऊन’ अन् ‘सोशल डिस्टन्सिंग’ची ‘एैसीतैशी’, दशहतवाद्यांच्या म्होरक्याच्या अंत्यसंस्कारासाठी ‘तोबा’ गर्दी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात बुधवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी कमांडरच्या अंत्यसंस्कारात शेकडो लोकांनी हजेरी लावली. आणि अशा प्रकारे कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे लोकांनी उल्लंघन केले आणि सामाजिक अंतर देखील राखले नाही. माहितीनुसार, सजाद नवाब डार असे ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. त्याच्या घरच्यांनी वैद्यकीय कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यावर मृतदेह घेण्याआधी अंत्यसंस्कारादरम्यान सामाजिक अंतर पाळले जाईल, असे एका पत्रात लिहून दिले होते. परंतु, यावेळी त्यांनी सर्व नियम मोडून काढले. त्यानंतर, आता चौकशीचे आदेश देण्यात आले असून अंत्यसंस्काराच्या वेळी जमलेल्या व्यक्तींवर संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

चकमकीत मारला गेला :
मंगळवारी रात्री सुरक्षा दलाने उत्तर काश्मीर जिल्ह्यातील सोपोरमधील अरमपोरा परिसर घेरला आणि शोधमोहीम सुरू केली. तेथे दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल माहिती मिळाली होती. अतिरेक्यांना पळण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा दलाने रात्री या भागात शोध घेत कडेकोट बंदोबस्त ठेवला. यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि मग चकमकीला सुरुवात झाली. यात जैश-ए-मोहम्मदचा कमांडर सजाद नवाब डार मारला गेला.

राज्यात एकूण 158 कोरोना प्रकरणे
बुधवारी जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची आणखी 33 प्रकरणे नोंदली गेली, जी एका दिवसातली सर्वाधिक वाढ आहे. यासह या केंद्रशासित प्रदेशातील कोविड -19 ची एकूण प्रकरणे वाढून 158 झाली आहेत. 149 संक्रमित लोकांवर उपचार सुरू आहेत. नवीन प्रकरणांपैकी 30 काश्मीर विभागातील आणि तीन जम्मू विभागातील आहेत. दोन रूग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला.