काश्मीरमध्ये दोन पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा, एक जवान शहीद

श्रीनगर : वृत्तसंस्था – पाकिस्तानने जम्मु-काश्मीरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या बाजूने झालेल्या गोळीबारीला प्रत्युत्तर देताना भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या दोन सैनिकांचा खात्मा केला आहे. चकमकीमध्ये भारताचा एक जवान शहीद झाला आहे. जम्मू-काश्मीरच्या तंगधार आणि केरन सेक्टरमध्ये ही चकमक उडाली.

रविवार आणि सोमवारनंतर आज पुन्हा पाकिस्तानने सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत मोर्टारचा मारा केला. तसेच आज दुपारनंतर पाकिस्तानने जम्मु-काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात गोळीबार केला. त्याला भारतीय जवानांनी चोख उत्तर दिले. या गोळीबारात पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले. तर सुंदरबनी येथे झालेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे.

तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानने गोळीबार सुरु ठेवला आहे. गोळीबार करताना पाकिस्तानने मोर्टारचाही मारा केला. रविवारी पाकिस्तानने पुंछ सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबारी केली. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारीमध्ये एका दहा वर्षाचा मुलगा जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना या मुलाचा मृत्यू झाला.

आरोग्यविषयक वृत्त