आतांकवाद्यांसोबत पकडल्या गेलेल्या DSP सोबत देखील ‘टेररिस्ट’ सारखी ‘वर्तणूक’ करा, जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी सांगितलं

श्रीनगर : वृत्त संस्था – जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, दोन दहशतवाद्यांसोबत अटक करण्यात आलेला डीएसपी देविंदर सिंहसोबतही दहशतवाद्यांसारखा व्यवहार केला जाईल. जम्मू आणि काश्मीरचे इन्स्पेक्टर जनरल (आयजी) विजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही डीएसपी देविंदर सिंह यांच्या सहभागाला घोर अपराध मानतो, आणि त्यांच्यावरही इतर दहशतवाद्यांसारखीच कारवाई केली जाईल.

अधिकार्‍यांनी सांगितले, सध्या विमानतळावर तैनात असलेल्या डीएसपी देविंदर सिंहला नवीद बाबू आणि अलताफ नावाच्या दहशतवाद्यासोबत शनिवारी ताब्यात घेण्यात आले होते. तो दहशतवाद्यांना काश्मीर खोर्‍यातून बाहेर घेऊन जात होता, असा आरोप या पोलीस अधिकार्‍यावर आहे.

त्या वाहनात पाच ग्रेनेड होते आणि नंतर सिंह याच्या घराची झडती घेतली असता दोन एके-47 रायफल सुद्धा सापडल्या. सिंहने राज्य पोलीस दलाच्या अनेक वरिष्ठ पदावर काम केले आहे. आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, पोलिसांकडे संसदेवरील हल्ल्यातील दोषी आरोपी अफजल गुरुप्रकरणात देविंदर सिंह याच्या सहभागाची कोणतीही नोंद नाही. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी डीएसपीच्या सहभागाला दुर्दैवी म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/