फासावर जाण्यापूर्वी दहशतवादी ‘अफजल गुरु’ने ‘चिठ्ठी’त लिहिले होते DSP देवेंद्र सिंहचे नाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरच्या एका डीएसपीच्या गाडीतून दोन दहशतवाद्यांना पकडण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच गाजले. त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत की डीएसपी दहशतवाद्यांना मिळाला होता की डिएसपी एखाद्या ऑपरेशनचे प्लॅनिंग करत होता. हा डीएसपी देवेंद्र सिंह तोच व्यक्ती आहे. ज्याच्यावर संसद हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप दोषी अफजल गुरुने लावला होता.

11 जानेवारी 2020, श्रीनगर-जम्मू नॅशनल हायवे, कुलगाम 
जम्मू काश्मीर पोलीसचे डीएसपी देवेंद्र सिंह श्रीनगरपासून जम्मूच्या आपल्या सरकारी गाडीतून निघाला होता. देवेंद्रच्या कारमध्ये दोन आणखी लोक होते. परंतु जसे की डीएसपीची गाडी कुलगामजवळ पोहचली तेव्हा गाडी अडवण्यात आली. गुप्त सुत्रांकडून माहिती मिळाली होती की हिजबुल मुजाहिदीनचे काजी दहशतवादी श्रीनगरपासून जम्मूला जात होते. जेथे ते कोणतातरी हल्ला करणार होते, परंतु या हल्ल्याचा डीएसपी देवेंद्र सिंह यांच्या गाडीशी काय संबंध होता हे लक्षात आले नाही. एक असा पोलीस अधिकारी ज्याला दहशतवादी कारवाईच्या विरोधात महत्वाची भूमिका निभावणासाठी 2018 मध्ये राष्ट्रपती मेडल मिळाले होते. जे अ‍ॅंटी टरेर ग्रुपचे सदस्य देखील होते.

असे घेतले ताब्यात 
डीएसपी देवेंद्र सिंह चार दिवस सुट्टीवर होते. सुट्टीच्या दरम्यान देवेंद्र श्रीनगरपासून जम्मू आणि चंदीगड जाणार होते. परंतु पोलीस तपासात जेव्हा त्यांच्या गाडीला रोखण्यात आले तेव्हा तैनात अधिकाऱ्याने आपली ओळख विचारली. परंतु त्यानंतर जेव्हा कारमध्ये बसलेल्या लोकांची चौकशी केली गेली तेव्हा ते दोन हिजबुल मुजाहिदीनचे दहशतवादी होते. एकाचे नाव हिज्बुल कमांडर सईद नवीद आणि दुसरा रफी हैदर होता. हा खुलासा झाल्यानंतर डीएसपीसह 3 लोकांना ताब्यात घेण्यात आले.

दहशतवाद्यांना नेले जात होते दुसऱ्या शहरात
जम्मू काश्मीर पोलिसांच्या एका गाडीत डीएसपी  दोन दहशतवाद्याबरोबर सापडल्याचे वृत्त आले. प्रकरण अत्यंत गंभीर आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी केले गेली. प्राथमिक माहिती मिळाली की दहशतवादी आणि देवेंद्र यांच्यात 12 लाख रुपयांचे डील झाले होते. ज्याअंतर्गत दहशतवाद्यांना गाडीतून जम्मूतील सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणे. दहशतवाद्यांचा प्लॅन होता की पहिल्यांदा चंदीगड आणि नंतर दिल्लीत जायचे होते. सूत्रांच्या माहितीनुसार या दहशतवाद्यांची दिल्ली, चंदीगड, पंजाबमध्ये हल्ला करण्याची योजना होती. डीएसपी यासाठी दहशतवाद्यांना साथ देत होता.

माहिती मिळाली की डीएसपी देवेंद्र सिंह हे अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांच्या संपर्कात होते. एवढेच नाही तर 2018 मध्ये तो या दहशतवाद्यांना जम्मूमध्ये घेऊन आला होता. त्यातील एक दहशतवादी नवीद जम्मू काश्मीर पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला होता, जो 2017 मध्ये हिजबुल मुजाहिदीनमध्ये सहभागी झाला होता.

अफजल गुरुने केला होता खुलासा
दहशतवाद्यांबरोबर सापडल्यानंतर डीएसपीसंबंधित आता प्रश्न उपस्थित होत आहेत. 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात अफजल गुरुने न्यायालयात देवेंद्र सिंहबद्दल जे काही सांगितले होते ते सत्य होते का ? संसदेवर झालेल्या हल्ल्यात जैशच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला म्हणजेच मोहम्मदला श्रीनगरपासून दिल्लीला देवेंद्र सिंह याने पाठवले होते ? देवेंद्र सिंह जम्मू काश्मीर पोलीसमध्ये दहशतवाद्यांबरोबर किंवा त्यांच्या गुप्तचर यंत्रणाबरोबर काम करत होता ?

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/