Jammu Kashmir Police | … म्हणून भाजप नेत्यांनीच रचला दहशतवादी हल्ल्याचा बनाव; भाजप नेत्यांसह चौघांना अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कुपवाडा येथे दहशतवादी हल्ल्याचा बनाव केल्याप्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी (Jammu Kashmir Police) भाजपच्या (BJP) दोन पदाधिकाऱ्यांना आणि दोन खासगी सुरक्षा रक्षकांना अटक केली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी (Jammu Kashmir Police) त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्याला पोलिसांकडून संरक्षण (Police protection) मिळावे यासाठी दहशतवादी हल्ला (Terrorist attack) झाल्याचा बनाव रचल्याची माहिती अटक (Arrest) करण्यात आलेल्या भाजप नेत्यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इश्फाक अहमद मीर (Ishfaq Ahmed Mir) असे अटक करण्यात आलेल्या भाजपच्या दोन नेत्यापैकी एकाचं नाव आहे. मीर हा कुपवाडा (Kupwada) येथील भाजपच्या आयटी सेलचा (IT cell) प्रमुख आहे. त्याने पक्षाचे जिल्हा प्रवक्ते बशरत अहमद (Basharat Ahmed) आणि आपल्या खासगी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने दहशतवादी हल्ल्याचा बनाव रचला. भाजपने इश्फाकचे वडील मोहम्मद मीर यांना पदावरुन निलंबित केल्याची माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत भाजपचे कुपवारा जिल्हाध्यक्ष असलेल्या मोहम्मद शाफी मीर यांना पदावरुन हटवले आहे, असे भाजपच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पोलीस संरक्षणासाठी रचला बनाव

पोलिसांनी अटक केलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांकडे सखोल चौकशी केली. चौकशीमध्ये इश्फाक आणि बशरत यांनी त्यांच्या सरक्षा रक्षकांनी बनाव केल्याचे समोर आले. पोलिसांकडून सुरक्षा मिळावी या हेतून आपल्यावर हल्ला झाल्याचा बनाव भाजप नेत्यांनी केला. पोलिसांनी सुरक्षा रक्षकांकडे कसून चौकशी केली असता हा गंभीर प्रकार समोर आला. याशिवाय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी खोटी माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. एका हिंदी वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

हे देखील वाचा

Rahul Gandhi | ‘त्यांच्याकडे डोकं नाही’ ! गिरिराज सिंह यांचा राहुल गांधींवर इटालियन भाषेत पलटवार

Nashik Crime | मित्रानेच केला घात; गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Jammu Kashmir Police | jammu and kashmir 2 bjp leaders arrested faking militant attack

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update