भाजपचे महासचिव राम माधव यांनी जम्मू-काश्मीरच्या भविष्याबद्दल सांगितले ‘हे’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजप आता तेथील मतदार संघाची पुर्नरचना करण्याच्या तयारीला लागला आहे ज्या जम्मू काश्मीरमधील नेत्यांचा विरोध राहिला आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांंनी यावर माहिती देताना सांगितले की जम्मू काश्मीरमधील मतदार संघांची पुर्नरचना लवकरच करण्यात येणार आहे. यासाठी राज्य पुर्नरचना आयोग बनवण्यात येणार आहे.

मतदार संघांंची पुर्नरचना होणार –
जम्मू काश्मीरमध्ये सध्या संचार बंदी लागू करण्यात आली आहे. तेथील स्थानिक पक्षांच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. सध्या संपूर्ण देशात उस्ताह असला तरी काश्मीरमध्ये मात्र गंभीर वातावरण आहे.

राम माधव यांनी माहिती देताना सांगितले की, जम्मू काश्मीरच्या मतदार संघाची पुर्नरचना होणार आहे, यासाठीच्या प्रक्रियात राज्यातील संबंधित संस्थाना सहभागी करुन घेण्यात येईल. ते म्हणाले की, कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील लोकांचा फायदा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार त्यांना विकासाच्या रस्तावर आणेल.

जम्मू काश्मीरमध्ये शांतता कायम राहिलं –
जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा सध्या वाढवण्यात आली आहे. यावर बोलताना राम माधव म्हणाले की, सुरक्षा यंत्रणेंना अलर्टसाठी सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. कारण सैन्य परत बोलावल्यावर जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्तापित रहावी. यासारखी संचार बंदी या आधीचे सरकार देखील जम्मू काश्मीरमध्ये लावत होती. पहिल्यांदा देखील इंटरनेट बंद ठेवण्यात येत होते. पहिल्यांदा देखील नेत्यांना नजर बंदीत ठेवण्यात येत होते. खोऱ्यातील लोकांना माहित आहे की केंद्र सरकार त्यांच्या भल्यासाठी हे सर्व करत आहे. सुरक्षा कमी केल्यानंतर देखील जम्मू काश्मीरमध्ये शांतता कायम राहिलं.

आरोग्यविषयक वृत्त –