J & K : 3 BJP नेत्यांच्या हत्येच्या पाठीमागे ‘लश्कर-ए-तैयबा’चा हात

श्रीनगर : पोलीसनामा ऑनलाइन  –  जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या ऑपरेशनेने हवालदिल झालेल्या दहशतवाद्यांनी आता राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना निशाणा बनवण्यास सुरूवात केली आहे. दक्षिण काश्मीरच्या कुलगाममध्ये काल रात्री दहशतवाद्यांनी भाजपाच्या 3 नेत्यांची हत्या केली. दहशतवाद्यांचा शोध लष्कर घेत आहे, परंतु जे नेते मारले गेले त्यांच्या घरात शोकाकुल वातावरण आहे.

या संपूर्ण प्रकारावर जम्मू-काश्मीर पोलीसच्या आयजींचे म्हणणे आहे की, आम्ही 5 ऑगस्टच्या अगोदर 16 ते 19 लोकांची यादी बनवली होती आणि या लोकांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. यामध्ये फिदा हुसैन सुद्धा होते, परंतु काही दिवसांपूर्वी ते शपथपत्र देऊन घरी आले होते. आम्ही तपास करू की ते घरापासून इतक्या दूर काय करण्यासाठी आले होते, जेथे त्यांची हत्या झाली.

जम्मू-काश्मीर पोलिसांच्या आयजींचे म्हणणे आहे की, हा प्री-प्लॅन अटॅक वाटत आहे. गाडीचा पाठलाग करण्यात आला आणि नंतर दहशतवाद्यांकडून गोळी मारण्यात आली आहे. त्यांनी म्हटले की, पाकिस्तान स्पॉन्सर टेररिझम आहे. तेथूनच लोकांना धमकी दिली जाते आणि लोकांची हत्या करण्याचा प्लॅन रचला जातो. या प्रकरणात तीन स्थानिक दहशतवाद्यांवर संशय आहे, ज्यामध्ये अब्बास शेख, निसार सहभागी आहेत.

दरम्यान, कुलगाम हल्ल्यात मारला गेलेला भाजपा युवा मोर्चाचा महासचिव फिदा हुसैनच्या मुळे गावात अंत्ययात्रा काढण्यात आली. काल कुलगामच्या वायकेपोरामध्ये फिदा हुसैन आणि अन्य दोन भाजपा कार्यकर्त्यांची दहशतवाद्यांनी गोळी मारून हत्या केली होती. नेत्यांचे कुटुंबिय दु:ख आणि संतापात आहेत.

अंत्ययात्रेत स्थानिक लोकांची गर्दी झाली होती. ज्यावरून स्पष्ट होते की, अशा हल्लेखोरांना काश्मीर घाबरणार नाही. सरकारने यास भ्याड कृत्य म्हटले आहे. मारेकर्‍यांना वाचणार नाहीत असेही म्हटले आहे. या हल्ल्याची जबाबदारी लश्कर-ए-तैयबा ची एक संघटना द रेसिडंट्स फ्रंट (टीआरएफ) ने घेतली आहे.