श्रीनगरच्या चेक पोस्टवर झाला ‘दहशतवादी’ हल्ला, 2 हल्लेखोरांचा खात्मा तर 1 जवान ‘शहीद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथून मोठी बातमी समोर येत आहे. श्रीनगरमधील परिमपोरा भागात दहशतवादी आढळले. तर त्या दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा दलांमध्ये मोठी चकमक घडून आली. या चकमकीमध्ये एक सीआरपीएफचा जवान शहीद झाला आहे. तसेच या चकमकीत भारतीय सैन्याने २ दहशतवादींचा खात्मा केला आहे.

मिळालेली माहिती अशी की, श्रीनगरच्या लावेपोरा भागात पोरेमपोरा चेक पोस्टवर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. त्या दरम्यान सीआरपीएफच्या जवानांनी मोर्चा आपल्या ताब्यात घेतला आणि कारवाई करण्यास सज्ज झाले. दरम्यान या भागात अजून काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती समोर येत आहे.

परिसरात सध्या सीआरपीएफ जवान त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याला जिवंत पकडले असून तो जखमी अवस्थेत आहे तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्यापही चकमक सुरू असल्याचे सांगितले जात आहे.