J & K : भरधाव ट्रकने 2 मोटारींना दिली धडक, दोघे ठार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भरधाव ट्रकने महामार्गावर दोन मोटारींना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भीषण अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. जम्मू-श्रीनगर महामार्गावर पंपोर परिसरात हा अपघात झाला आहे. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली.

भरधाव ट्रकने बोलेरो आणि स्विफ्ट कारला उडवले. ही धडक एवढी जबरदस्त होती की महामार्गावर दोन गाड्यांसह ट्रकही उलटा झाला. स्विफ्ट कारमधून चार जण प्रवास करत होते. त्यापैकी दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धडकेत कारची दिशा बदलून गेली आणि ट्रकही रस्त्यावर उलटा झाला. या ट्रकमध्ये असलेली माती खडी रस्त्यावर आली. या अपघातात जखमी झालेल्यांना एसडीएच पंपोर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like