भारतीय सैन्यानं पाकिस्तानला दिलं ‘ठासून’ उत्तर, काही चौक्या उध्दवस्त, 2 रेंजर्सचा ‘खात्मा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराला भारतीय सैन्याने पुन्हा एका चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानानी सैन्याला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याच्या अनेक चौक्या उद्धवस्त केल्या. यात दोन जवानांना मारण्यात आले.

बुधवारी जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने दोन मोर्टार डागल्या आणि गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याच्या या हकरतीमुळे भारतीय सैन्याचा एक जवान शहीद झाला. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानी सैन्याला आर्टिलरी आणि मोर्टारच्या सहाय्याने चोख प्रत्युत्तर देण्यात आले.

काल रात्री उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषाचे पाकिस्तानकडून उल्लंघन करण्यात आले. भारतीय सैन्याने कारवाई करत पाक सैन्याच्या अनेक चौक्या उद्धवस्त केल्या. याबरोबरच पाकिस्तानने कबूल केले ती त्यांचे दोन सैनिक पाकव्यप्त काश्मीरच्या देवा सेक्टरमध्ये मारले गेले.

स्थानिक महिलेचा मृत्यू –

जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून सतत संघर्ष विरामचे उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तानने बुधवारी संध्याकाळी उरी सेक्टरमध्ये गोळीबार केला. पाकिस्तानच्या या नापाक हरकतीमुळे भारतीय सैन्याचा एक जवान शहीद झाला. याबरोबर एका रहिवासी भारतीय महिलेचा गोळीबारात मृत्यू झाला.

पाकिस्तानने बुधवारी सकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यावेळी आंतरराष्ट्रीय सीमेवरुन कठुआ जिल्ह्याच्या हीरानगर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/