डोवाल नव्हे तर ‘हा’ आहे काश्मीर प्रकरणाचा सूत्रधार ; वर्षभरापूर्वीच केले होते नियोजन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक या हल्यांमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे नरेंद्र मोदींचे विश्वासू आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल नेहमीच मोठ्या प्रकरणाचे सूत्रधार राहिले आहेत. काश्मीर प्रकरणाची सूत्रे देखील त्यांनीच हलवली आहेत असे तुम्हाला वाटू शकते पण या प्रकरणाचा सूत्रधार म्हणून एका नवीनच अधिकाऱ्याचे नाव समोर येत आहे. या अधिकाऱ्याचे नाव आहे बी.व्ही.आर. सुब्रमण्यम. त्यांनी आखलेल्या योजनेनुसारच अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुब्रमण्यम हे छत्तीसगढचे १९८७ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते सध्या जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव आहेत.

या अधिकाऱ्याने साधारण वर्षभरापूर्वी काश्मीरचे ३७० कलम रद्द करण्यापासून ते सुरक्षा व्यवस्था कशी ठेवावी याचे नियोजन केले होते. यासाठी हा अधिकारी गेल्या वर्षभरापासून काश्मीरमध्ये तळ ठोकून होता. या काळात पाकिस्तानवर एअर स्ट्राईकही झाला. याच काळात काश्मीरचे ३७० कलम बदलण्याचा मार्ग आखण्यात आला.

मोदींनी मोठी जबाबदारी सोपवत सुब्रमण्यम यांना जम्मू काश्मीरमध्ये पाठविले होते. महत्वाचे म्हणजे त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही चांगले संबंध होते. यामुळे छत्तीसगढमध्ये तीन वर्ष होताच त्यांना पुन्हा केंद्रामध्ये बोलावण्यात आले होते. डोवाल यांच्या शिफारशीमुळेच सुब्रमण्यम यांची काश्मीरमध्ये नियुक्ती झाली होती.

सुब्रमण्यम यांनी काश्मीरची जबाबदारी घेतल्यानंतर केंद्राने त्यांच्या अधिकाराखाली विश्वासू अधिकाऱ्यांची पूर्ण फलटणच उभी केली होती. रणनीतीनुसार तामिळनाडूचे सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी के. विजय कुमार यांना राज्यपालांचे सल्लागार बनविण्यात आले. त्यांचा संबंधही छत्तीसगढशी आलेला आहे. तेव्हा सुब्रमण्यम गृह विभागाचे सचिव होते आणि बस्तरच्या नक्षलवादावर अंकूश ठेवला होता.

आरोग्यविषयक वृत्त