पूछहून जम्मूमध्ये जाणाऱ्या बसचा अपघात, 10 प्रवाशांचा ‘मृत्यू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुंछ जिल्ह्यातून जम्मूला जाणारी एक प्रवासी बस नौशहरापासून 18 किलोमीटर दूर लंबेडीमध्ये एका खोल दरीत कोसळली. दुपारी झालेल्या या अपघातात 10 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे. पोलीस व स्थानिक लोक घटनास्थळी पोहचण्यास सुरुवात झाली आहे. जखमी आणि मृतांना दरीतून बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरु आहे. जखमींनी तात्काळ जवळच्या सुंदरबनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार बसवरुन चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली. या बसमधून 30 प्रवासी प्रवास करत असल्याची शक्यता आहे. ज्यातील 10 प्रवाशांच्या जागीच मृत्यू झाल्याची शक्यता आहे. परंतु अजूनही सर्व मृतांच्या आणि जखमी रुग्णालयात दाखल होऊ शकले नाहीत. पोलीस आणि स्थानिक लोक दरीत उतरुन जखमींना बसमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि रुग्णालयात नेले जात आहे.

असेही सांगितले जात आहे की जखमी प्रवाशांची परिस्थिती चिंताजनक आहे. सुंदरबनीमध्ये प्राथमिक उपचार झाल्यानंतर जखमी प्रवाशांना मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात येत आहे.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/