गरिबीशी संघर्ष ! 7 वर्षीय मुलीची ऑनलाइन शिक्षण घेण्याची इच्छा झाली पूर्ण, 12 आंबे विकल्यानंतर मिळाले 1.2 लाख रूपये

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने अनेकांचा जीव घेतला तर अनेक लोकांना आर्थिक विवंचनेत टाकले आहे. जमशेदपुरची (jamshedpur) तुलसी कुमारी सुद्धा त्यांच्यापैकीच एक आहे. तुलसीचा गरीबीविरूद्ध संघर्ष आणि अभ्यासाची आवड पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटत आहे. 7 वर्षांच्या तुलसीला एक अँड्रॉईड मोबाईल हवा होता, ज्याच्या माध्यमातून ती ऑनलाइन क्लासमध्ये सहभागी होऊ शकली असती.

jamshedpur 7 year old girl tulsi kumari selling mangoes to buy mobile for online study

यासाठी तुलसीने लॉकडाऊनच्या दरम्यान आंबे विकण्यास सुरूवात केली. या मोबाईलसाठी तिला 10 हजारपेक्षा जास्त पैशांची आवश्यकता होती जे लवकर मिळणे अवघड होते. व्हॅल्यूएबल एज्युटेनमेनर प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अमेय हेटे आणि त्यांच्या वडीलांना तिची अभ्यासाची आवड पसंत पडली आणि त्यांनी 12 आंबे 1.2 लाख रूपयांत खरेदी केली.

एक आंबा खरेदी केला 10 हजारात

तुलसीसाठी देवदूत बनून आलेल्या अमेय हेटे आणि त्यांचे वडील नरेंद्र हेटे यांनी निष्पाप बालिकेकडून 10 हजार रुपयात एक आंबा खरेदी केला. त्यांनी मुलीकडून 12 आंबे खरेदी केले. बदल्यात त्यांनी 1.20 लाख रुपये दिले. इतकेच नव्हे, तर तुलसीला एक मोबाईल फोन आणि दोन वर्षाचे इंटरनेटसुद्धा मोफत मिळाले. जेणेकरून तिला ऑनलाइन अभ्यास करता यावा. नरेंद्र हेटे आणि त्यांचा मुलगा अमेय हेटे हे तुलसीची मदत केल्याने खुश आहेत.

तुलसीच्या वडिलांनी मानले आभार

अमेय हेटे आणि नरेंद्र हेटे यांनी मुलीची मदत केल्याने तिचे वडील खुप खुश आहेत. तुलसीचे वडील श्रीमल कुमार यांचे म्हणणे आहे की, या वाईट काळात नरेंद्र हेटे त्यांच्याकडे देवाच्या रूपात आले आणि मुलीला पुढे शिक्षण करता आले. यावेळी तुलसीची आई पद्मिनी देवी यांनी नरेंद्र हेटे यांचे आभार मानले. आता तुलसीचा चेहरा खुश दिसत आहे. आता ती म्हणते, मला आंबे विकावे लागणार नाहीत. त्या आंब्यांमुळे माझे जीवन बदलून गेले.

हे देखील वाचा

 

Sharad Pawar | ‘महाविकास’ सरकार 5 वर्षे टिकणार, तिन्ही पक्षात मतभेद नाहीत’

OBC Reservation | काँग्रेस नेते म्हणजे अज्ञानाचा महामेरु, ओबीसी आरक्षणावरुन भाजप नेत्याचा काँग्रेसला टोला

Love affair | ‘कोविड’च्या काळात सोशल मीडियावरून मुला-मुलींचं ‘सूत’ जुळण्यात वाढ, महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून 69 पोरींनी बॉयफ्रेन्डसाठी घर सोडलं

ram mandir ayodhya | घोटाळ्याचा आरोप करणार्‍यांना कोर्टात खेचणार राम मंदिर ट्रस्ट, निशाण्यावर प्रियंका गांधी आणि संजय सिंह

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : jamshedpur 7 year old girl tulsi kumari selling mangoes to buy mobile for online study

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update