होय- होय, भारतात ‘जय श्रीराम’ची घोषणा देणार्‍या 17 विद्यार्थ्यांचं चक्‍क निलंबन, शाळेत येण्यास मनाई

रांची : वृत्तसंस्था – झारखंडच्या जमशेदपूर शहरात जय श्री रामी घोषणा  केल्याने 17 शालेय विद्यार्थ्यांना निलंबित केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ही  घटना बिष्टुपूरच्या बेल्डीह चर्चमधील शाळेतील आहे. एका वृत्तानुसार, मंगळवारी 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपने खेळता खेळता शाळेच्या कॅम्पसमध्ये  जय श्री राम घोषणा केली. जेव्हा याबाबत प्रिन्सिपल एल पीटरसन आणि इतर सदस्यांना माहिती पडलं तेव्हा आनन फानन मध्ये शिस्त समितीची बैठक बोलावण्यात आली. यानंतर घोषणा देणाऱ्या मुलांना 5 दिवसांसाठी सस्पेंड करण्यात आलं. यादरम्यान त्यांना शाळेत न येण्याची सूचना देण्यात आली.

 

जय श्रीराम का नारा लगाने पर 17 छात्र सस्पेंड, स्कूल आने से किया मना

जिल्हा शिक्षण अधीक्षकांकडे तक्रार

या प्रकरणाची माहिती मिळताच अंकित आनंद आणि ऑल झारखंड स्टुडेंट युनियन(आजसू) चे नेते अप्पू तिवारी यांनी याची तक्रार जिल्हा शिक्षण अधीक्षकांकडे केली. या तक्रारीत म्हटलं होतं की, “शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांवर कारवाई करून हिंदूंच्या धार्मिक भावनांसोबत खेळ केला आहे. जय श्री रामची घोषणा दिल्याने कारवाई करणं अयोग्य आहे. त्यामुळे शाळेवर कारवाई करण्यात यावी.”

जिल्हा शिक्षण पदाधिकारी शिवेंद्र कुमार म्हणाले, “या घटनेची माहिती मिळाली आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणी नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल.” शाळेचे प्रिन्सिपल एल पीटरसन यांचं म्हणणं आहे की, “शालेय परिसरात अशा घोषणा दिल्याने आधी एमएनपीएस मध्ये वाद झाला आहे. आम्हाला इथे कोणताही वाद नको आहे. त्यामुळे मुलांना शिस्त लागावी यासाठी स्टडी लिव देण्यात आली आहे. या मुलांच्या परीक्षा आगामी 1 ऑक्टोबर पासून सुरु होत आहेत.”

 

Visit : policenama.com