बिहारमधील आमदारानं पत्नीसह बनवला ‘टिक-टॉक’ व्हिडीओ, ‘गावभर’ झाल्यानंतर SP ऑफिसकडे धाव !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहार राज्याच्या जमुई जिल्ह्यातील सिकंदरा मतदारसंघाचे काॅंग्रेसचे आमदार सुधीर कुमार उर्फ बंटी चौधरी यांनी आपल्या पत्नीसोबत एक टिक-टॉक व्हिडीओ बनवला होता. समाजमाध्यमांवर तो व्हिडीओ व्हायरल होताच त्यांना नाहक त्रासास सामोरे जावे लागले. आमदारांनी तात्काळ कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे धाव घेतली.

या प्रकरणात आमदार सुधीर कुमार हे तात्काळ कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहचले. आमदार सुधीर कुमार यांनी आपल्या पत्नी सोबत एक टिक-टॉक व्हीडीओ बनवला होता. शुक्रवारी कुमार स्वतः एसपी यांच्या जनता दरबारात उपस्थित झाले आणि व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

नाव खराब करण्याचा प्रयत्न –
आमदाराच्या म्हणण्यानुसार बनवलेला टिकटॉक व्हिडीओ हा व्यक्तिगत होता. परंतु कोणीतरी आपल्या पत्नीचे टिकटॉक अकाउंट हॅक करून हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ एकदम वैयक्तिक होता.परंतु तो सोशल मीडिया वर वेगवेगळ्या ठिकाणी व्हायरल केला जात असल्याबद्दल तक्रार नोंदवली.

आमदारांनी केला आरोप
चौधरी म्हणाले, हे विरोधकांचेच कटकारस्थान आहे. कुमार यांनी दोन व्यक्तींचे नाव घेत सांगितले कि, व्हिडीओ हॅक करणारे दुसरे तिसरे कोणी नसून आमचे विरोधकच आहेत. मागच्या काही दिवसापासून समाज माध्यमांवर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –