Jan Ashirwad Yatra | नारायण राणे यांच्या ’जन आशीर्वाद यात्रे’वर मुंबई पोलिसांनी आतापर्यंत दाखल केले 42 FIR

मुंबई : Jan Ashirwad Yatra | केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्या जन आशीर्वाद यात्रे (Jan Ashirwad Yatra) वर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आतापर्यंत 42 एफआयआर दाखल (registered 42 FIRs) केले आहेत. आयपीसीच्या विविध कलामांसह महामारी कायद्यांतर्गत (Epidemic Act) दाखल केलेल्या या एफआयआरमध्ये मंत्री आणि कार्यकर्त्यांवर मुंबईच्या विविध भागात जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान कोविड- 19 नियमांच्या (Covid-19 rules) उल्लंघनाचा आरोप आहे.

महाराष्ट्र सरकारने यापूर्वी मुंबईत भाजपाच्या रॅलीत कोविड नियमांकडे दुर्लक्ष केल्याने 17 एफआयआर दाखल केले होते. 20 ऑगस्टपर्यंत भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांवर मुंबईच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये 19 एफआयआर नोंदले गेले होते.

राणे यांनी मुंबई पोलिसांकडून लागू प्रतिबंधाकडे दुर्लक्ष करत 19 ऑगस्टला जन  आशीर्वाद यात्रेला सुरूवात केली होती. अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यात महामारीच्या प्रकोपादरम्यान रॅली काढण्यास विरोध दर्शवला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 10 ऑगस्टला घोषणा केली होती की, केंद्रात नव्याने मंत्री झालेले नेते जन आशीर्वाद यात्रा काढतील. मात्र या यात्रांमुळे कोरोनाचे संकट येत्या काही दिवसात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील वाचा

NABARD | नाबार्डचे कर्ज आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 25.2 टक्के वाढून 6 लाख कोटी रुपयांवर पोहचले

Pune Crime | लाेणी काळभाेर परिसरात दहशत पसरविणारी टोळी तडीपार

Indian Railways | रेल्वेने दिला इशारा! ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान केली ‘ही’ चूक तर होईल 3 वर्षांचा कारावास, भरावा लागेल दंड; जाणून घ्या

GST | कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! AAR ने म्हटले – ‘कँटीन चार्जवर लागणार नाही जीएसटी’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Jan Ashirwad Yatra | 42 firs have been registered by mumbai police regarding narayan ranes jan ashirwad yatra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update