खुशखबर ! मोदी सरकारची मोठी घोषणा, कोटयावधी ‘जनधन’ खोतेदारांना मिळणार ‘ओवर ड्राफ्ट’ची सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थ मंत्रालयाने नुकतीच जनधन खात्यासंबंधित आकडेवारी जाहीर केली आहे. जनधन योजनेअंतर्गत बँकांमध्ये ३५.९९ कोटी खाती खोलण्यात आली आहेत. यातील २९.५४ कोटी खाती वापरात आहेत. अर्थ राज्य मंत्री अनुराग सिंह ठाकूरने यांनी यासंंबंधित माहिती राज्यसभेत दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थ संकल्पात ही घोषणा केली होती.

जनधन खाते असलेल्या महिलांना ओवर ड्राफ्टची सुविधा देण्यात आली आहे. ही सुविधा त्याच महिलांना मिळणार आहे, जे एखाद्या अधिकृत महिला सेल्फ हेल्प ग्रुपच्या सदस्य आहेत. या सुविधेमुळे महिलांना छोटे व्यवसाय सुरु करण्यास मदत मिळणार आहे. याशिवाय जनधन योजनेत खातेधारकांना १० हजार रुपयांपर्यंतचा ओवरड्राफ्टची सुविधा मिळणार आहे. याआधी ही सुविधा ५ हजार रुपये होती.

अर्थ मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी राज्यसभेत सांगितले की, जनधन योजने अंतर्गत खासगी क्षेत्रातील बँकांना देखील खाती खोलण्याची संमती देण्यात आली आहे आणि त्यात मिळालेल्या माहितीनुसार खासगी क्षेत्रातील प्रमुख बँकांद्वारे १.२३ कोटी खाती खोलण्यात आली आहेत.

महिलांसाठी विशेष सुविधा
सरकारी आकडेवारी नुसार जनधन खात्यात एकूण जमा रक्कमेत वाढ होत आहे आणि हे ३ एप्रिलला ९७,६६५ रुपयांपर्यंत पोहचली आहे.

एकूण खात्यात ५०% हून आधिक खाते हे महिलांच्या नावे आहेत. तर एकूण खात्यातील जवळपास ५९ % खाते ग्रामीण भागातील आणि निम शहरी भागातील आहेत.

जनधन खाते असलेल्या महिलांना जे एखाद्या सेल्फ हेल्प ग्रुपमधील आहेत, त्यांना ५००० रुपयांपर्यंतची ओवर ड्राफ्टची सुविधा देण्यात आली आहे.

काय आहे ओवर ड्राफ्ट सुविधा
ओवर ड्राफ्ट सुविधा म्हणजे, जर कोणत्याही जनधन खातेधारकांचा रेकॉर्ड चांगला असेल आणि गरज पडल्यास खात्यात पैसे नसल्यास ओवरड्राफ्टच्या लिमिट पर्यंत बँकेतून रक्कम काढता येईल.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात