‘बाहूबली’ पप्पू यादवचं CM योगींना बिहारमध्ये येण्याचा ‘आव्हान’, केली ‘वादग्रस्त’ टिप्पणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जन अधिकार पार्टीचे अध्यक्ष पप्पू यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्या विरोधात पप्पू यादव 19 डिसेंबर रोजी डाव्यांसोबत मिळून बिहार बंद करणार होते. परंतु सरकारनं कलम 107 अंतर्गत त्यांना नजरकैद केलं. पटनातील मंदिर भागात असणाऱ्या त्यांच्या घरी मंगळवारी त्यांना नजरकैद करण्यात आलं.

PM मोदींवर टीका
प्रदर्शनादरम्यान पप्पू यादव बेड्या आणि हातकड्या घालून पटनाच्या डाक बंगल्याजवळ पोहोचले होते. ते म्हणाले होते की, “नागरिकत्व दुरुस्ती कायदा संविधानाच्या आत्म्यावर हल्ला आहे. या कायद्यानं देशाची वाटणी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.” त्यांनी या कायद्यापासून स्वातंत्र्याची मागणी केली होती.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून पप्पू यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. पप्पू यादव यांनी आरोप केला होता की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्या मदतीनं केंद्र सरकार देशाची हिंदू आणि मुसलमान अशी वाटणी करण्याचा प्रयत्न करत आहे.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/