JanDhan Account | SBI, PNB सह ‘या’ 6 बँकांमध्ये असेल जनधन खाते तर ‘या’ पध्दतीनं तपासा बॅलन्स, जाणून घ्या पद्धत?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जनधन खातेधारकांसाठी (JanDhan Account) कामाची बातमी आहे. जर तुम्ही कोणत्याही बँकेत जनधन खाते (JanDhan Account) उघडत असाल तर आता सहजपणे आपल्या खात्याचा बॅलन्स जाणून घेवू शकता. बॅलन्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला केवळ मिस्ड कॉल द्यावा लागेल. आज आम्ही तुम्हाला SBI, PNB, Axis Bank, बँक ऑफ इंडिया (Bank Of India), HDFC Bank आणि ICICI सह अनेक बँकांचे नंबर सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमचा बॅलन्स जाणून घेऊ शकता. कोणतेही बँकेत खाते असो, आता तुम्ही कोणत्याही टेन्शनशिवाय बॅलन्स जाणून घेवू शकता.
कोणत्या बँकेचा बॅलन्स चेक करण्यासाठी कोणता नंबर आहे ते जाणून घेवूयात (Jandhan Accountholder balance check number)…
1. एसबीआय (SBI)
एसबीआय कस्टमर केयर नंबर 18004253800 आणि 1800112211 वर कॉल करा. भाषा निवडा. बॅलन्स आणि शेवटच्या पाच ट्रांजक्शनसाठी 1 दाबा. आता बॅलन्स समजेल. याशिवाय बँकेत रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 92237 66666 वर कॉल करू शकता.
2. पीएनबी (PNB)
बँकेत रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 18001802223 किंवा 01202303090 वर मिस कॉल केल्यानंतर एसएमएसद्वारे खात्याची बॅलन्स समजू शकता.
3. आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)
9594612612 वर मिस कॉल करा. याशिवाय IBAL लिहून 9215676766 वर मेसेज करा.
4. एचडीएफसी बँक (HDFC Bank)
एचडीएफसी ग्राहक टोल फ्री नंबर 18002703333, मिनी स्टेटमेंटसाठी 18002703355, चेक बुक मागवण्यासाठी 18002703366 वर, अकाऊंट स्टेटमेंट जाणून घेण्यासाठी 1800 270 3377 वर कॉल करा. (JanDhan Account)
5. बँक ऑफ इंडिया (Bank of India)
बँक ऑफ इंडियाचे ग्राहक 09015135135 वर मिस कॉल करून बॅलन्स जाणून घेवू शकतात.
6. अॅक्सीस बँक (Axis Bank)
अॅक्सीस ग्राहक रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 18004195959 वर कॉल करून बॅलन्स जाणून घेवू शकतात. मिनी स्टेटमेंटसाठी 18004196969 वर कॉल करा.
Web Title :- JanDhan Account | jandhan account holders check balance via missed call sbi pnb Axis Bank Bank Of India HDFC Bank ICICI Bank
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | रिक्षा-कार चालकाच्या वादात पोलीस कर्मचार्याला मारहाण