…म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे ‘ऊर्दू’ !

मुंबई : वृत्तसंस्था – ‘धडक’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी सिनेमांसाठी जोमाने तयारीला लागली आहे. जान्हवीने पहिल्याच सिनेमातून सगळ्यांनाच प्रभावित केलं. या चित्रपटाच्या  यशानंतर ती दोन बिग बजेट सिनेमांमध्ये भूमिका साकारणार आहे. त्यातील दिग्दर्शक करण जोहरच्या ‘तख्त’ सिनेमात जान्हवी प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट मुघल साम्राज्यावर आधारित आहे. म्हणून या चित्रपटासाठी जान्हवी ऊर्दू शिकत आहे.
चित्रपटात रणवीर सिंह, करीना कपूर, आलिया भट, अनिल कपूर, विक्की कौशल यांच्या या सिनेमात भूमिका आहेत. हा सिनेमा मुघल साम्राज्यावर आधारित असल्याने सिनेमातील कलाकारांना ऊर्दू भाषा शिकावी लागणार आहे. यांत जान्हवी जैनाब्दी महल ऊर्फ हिराबाई बी भूमिका साकारणार आहे. यासाठी तिलाही ऊर्दू शिकण्यास सांगण्यात आले आहे.

जान्हवी आता ऊर्दूचे धडे घेत असून या भाषेतील संवादफेकीवर ती बरीच मेहनत घेत आहे. इतकंच नाही तर तिला काही  पुस्तकंसुद्धा वाचण्यासाठी देण्यात आली आहेत. औरंगजेब- द मॅन अँड द मिथ आणि स्टोरीओ दो मोगोर ही बड्या इंग्रजी साहित्यिकांची पुस्तकं ती वाचत आहे. औरंगजेब व दाराशिकोहच्या कथेवर आधारीत  हा सिनेमा २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

Loading...
You might also like