Janhvi Kapoor | जान्हवी कपूरच्या नव्या फोटोने वेधले लक्ष; नथ परिधान करत केले चाहत्यांना घायाळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. जान्हवी सध्या या ना त्या कारणामुळे चर्चेत दिसत आहे. जान्हवीचे अनेक फोटोज सोशल मीडियावर नेहमीच शेअर होत असतात. ती तिच्या नवनवीन स्टाईलने लोकांना आश्चर्यचकित करत असते. जान्हवीने पुन्हा एकदा नव्या लूकमध्ये साडी परिधान करत त्याला बोल्डनेसचा टच देत सर्वांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसत आहे.

सध्या जान्हवीच्या या साडीमधील फोटोजने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. काही तासापूर्वीच जान्हवीने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जान्हवीने ब्राऊन कलरची सिल्क साडी नेसत त्यावर ट्यूब ब्लाउज घातला आहे. यावेळी तिने केस मेसी करत मोकळे सोडले असून न्यूड मेकअप करत केवळ एक मोठी नोज रिंग परिधान केले आहे. यावेळी जान्हवीचा (Janhvi Kapoor) लूक खूपच हॉट दिसत आहे. जान्हवीने कॅमेरासमोर विविध पोजेस देत फोटो शेअर केले आहे.

सध्या सोशल मीडियावर जान्हवीचा हा लूक व्हायरल होताना दिसत आहे. जान्हवीच्या चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटीजने देखील हॉट म्हणत तिच्या फोटोवर कमेंट केले आहे. जान्हवीने फार कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जान्हवी नुकतीच तिच्या ‘मिली’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

 

Web Title :-  Janhvi Kapoor | bollywood janhvi kapoor hot photoshoot in brown saree take a look

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anil Parab | ‘नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्याला बोलवा..;’ म्हणत, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी घेतले म्हाडाच्या सीईओला फैलावर

Pune Crime News | भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या डोक्यात घातला दगड, तीन जणांवर FIR; कोथरुडमधील घटना

Chandrasekhar Bawankule | ‘मोदी-शहांबद्दलचे प्रकाश आंबेडकरांचे ‘ते’ वक्तव्य म्हणजे मानसिक दिवाळखोरीचे लक्षण;’ चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

Pune Kasba Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुकांची भली मोठी यादी; काँग्रेस पक्षाची डोकेदुखी वाढणार