वय वर्ष 23, अवघे दोन सिनेमे नावावर असलेल्या जान्हवी कपूरने मुंबईत खरेदी केले अलिशान घर, किंमत ऐकून व्हाल थक्क

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी व बोनी कपूर यांची लेक अभिनेत्री जान्हवी कपूरने अवघ वय वर्ष 23 अन् केवळ दोन सिनेमे नावावर असताना मुंबईच्या जुहू भागात तब्बल 39 कोटी रुपये मोजून अलिशान घर खरेदी केले आहे. बॉलिवूडमध्ये गेल्यावर्षी कोरोना काळात आलिया भट्ट, हृतिक रोशन अशा अनेक स्टार्सनी नवे घर खरेदी केले. आता या यादीत जान्हवी कपूरचे नावही आले आहे.

स्क्वेअर फिट इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी 7 डिसेंबरला जान्हवीने घराची डिल फायनल केली. जुहूमधल्या इमारतीत 3456 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले हे घर जान्हवीने तब्बल 39 कोटींना विकत घेतले. यासाठी स्टँप ड्युटीपोटी तिने 78 लाख रुपये भरले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घरात 6 कारच्या पार्किंगची जागा आहे.

जान्हवीने 2018 साली ‘धडक’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यानंतर ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’ या सिनेमात ती झळकली. यावर्षी जान्हवी राजकुमार रावसोबत ‘रूही अफजाना’ या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय कार्तिक आर्यनसोबत ‘दोस्ताना 2’ या सिनेमातही तिची वर्णी लागली आहे. याशिवाय करण जोहरचा मल्टीस्टारर ‘तख्त’ हा सिनेमाही तिने साईन केला आहे.

कोरोना काळात जान्हवीच्या आधी आलिया भट्ट आणि हृतिक रोशननेही मुंबईत घर खरेदीकेले आहे. आलियाने रणबीर कपूर राहत असलेल्या इमारतीत नवा आशियाना खरेदी केला तर हृतिकने जुहूमधल्या पेंटहाऊससाठी तब्बल 100 कोटी दिले आहेत.