दीपिकाच्या ‘या’ गाण्यावर थिरकली जान्हवी कपूर, छताकडे पाहत बोनी कपूर झाले भावूक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने गेल्या वर्षी धडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. सध्या जरी तिने एकच सिनेमा केला असला तरी तिचा फॅन फॉलोविंग मात्र मोठ्या प्रमाणात आहे. रेड कारपेट पासून ते कॅज्युअल आउटिंगपर्यंत प्रत्येक ठिकाणी जान्हवी फिट दिसते.

नुकताच जान्हवी कपूरचा फिल्म फेअर अवॉर्डमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जान्हवी कपूरने फिल्मफेअर अवॉर्डमध्ये एक दमदार परफार्मन्स दिला आहे. फिल्मफेअर अवॉर्ड 20 एप्रिलपासून टीव्ही वर टेलीकास्ट होणार आहे. या निमित्ताने जान्हवीने पहिल्यांदाच अवॉर्ड फंक्शन मध्ये डान्स केला आहे. या फंक्शनमध्ये तिने अनेक गाण्यांवर डान्स केल्याचे दिसत आहे. त्यात दीपिका पादुकोणच्या पद्मावतमधील घूमर या गाण्याचाही समावेश आहे.

जान्हवी पूर्ण एनर्जीने घूमर डान्स करताना दिसत आहे. जान्हवीने तिच्या या परफॉर्मन्सचा व्हिडीओ चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात जान्हवी सुंदर दिसत आहे. तिच्या चाहत्यांना तिचा डान्स आवडलेला दिसत आहे. त्यात मध्येच बोनी कपूर यांच्यावर कॅमेरा नेल्याचे दिसत आहे. त्यांनी यावेळी छताकडे पाहिले आहे. ते थोडे भावूक झाल्याचेही दिसत आहे.

Loading...
You might also like