संजय लीला भन्साळींची पुढील हिरोईन असणार जान्हवी कपूर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळावी अशी इच्छा अनेक अॅक्टर अॅक्ट्रेसची असते. त्यांच्या मलाल आणि इंशाअल्लाह या सिनेमांची सध्या चर्चा असल्याचे दिसत आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, इंशाअल्लाह मध्ये सलमान खान सोबत आलिया भट्ट रोमान्स करताना दिसणार आहे. अशातच आता एक फोटो समोर आला असून हा फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत जान्हवी कपूरला भन्साळींच्या ऑफिसबाहेर स्पॉट करण्यात आलं आहे.

View this post on Instagram

M 🙌🏼

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

या फोटोवरून आता असे अंदाज लावले जात आहेत की, भन्साळी यांच्या पुढील सिनेमातील हिरोईन जान्हवी कपूर असणार आहे. माहितीसाठी म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की, जान्हवी कपूरने करण जोहरचा धडक या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा म्हणावा तितका चालला नाही. या सिनेमात जान्हवी कपूर अभिनेता ईशान खट्टर सोबत रोमांस करताना दिसून आली होती.

View this post on Instagram

Comfy cuddles 🌈

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या जान्हवी कपूर तिच्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. देशाची पहिली आयएएफ ऑफिसर गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा असणार आहे. या सिनेमात जान्हवी गुंजन सक्सेनाचा रोल करणार आहे. जान्हवीचे चाहते तिच्या या सिनेमाबाबत खूपच उत्साहित असल्याचे दिसत आहेत. याशिवाय जान्हवी तख्त या सिनेमातही दिसणार आहे. यात तिच्यासोबत करीना कपूर, रणवीर सिंग, विकी कौशल आणि अनिल कपूर हे कलाकारही दिसणार आहेत.

Loading...
You might also like