×
Homeताज्या बातम्याJanhvi Kapoor | जान्हवीने धर्मा प्रोडक्शन आणि करण जोहर बद्दल केले 'हे'...

Janhvi Kapoor | जान्हवीने धर्मा प्रोडक्शन आणि करण जोहर बद्दल केले ‘हे’ मोठे विधान

पोलीसनामा ऑनलाईन : Janhvi Kapoor | स्टार किड्स मध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर हिचे नाव आवर्जून घेतले जाते. जान्हवी ने ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर पुन्हा एकदा जान्हवी ‘गुंजन सक्सेना’ मध्ये दिसली होती. हा चित्रपट देखील करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली तयार झाला होता. याच कारणामुळे जान्हवीला खूप ट्रोल करण्यात आले. आता याच ट्रोलला जान्हवी ने सडेतोड असे प्रत्युत्तर देखील दिले आहे. (Janhvi Kapoor)

जान्हवीने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत तिला विचारण्यात आले होते की, “धर्मा प्रोडक्शनशी संबंधित असल्यामुळे तुला नेहमी ट्रोल केले जाते का?” यावर बोलताना जान्हवी म्हणाली, “मला वाटते की ही गोष्ट घडते कारण धर्मा हे नामांकित प्रोडक्शन हाऊस आहे आणि लोक हे माझ्या बाबतीत मुद्दाम करतात मी धर्मा प्रोडक्शन बरोबर एकत्रित काम केल्यामुळे सहज द्वेषाला बळी पडते. काही लोक धर्मा प्रोडक्शन जाणून घेण्यासाठी उत्सुक असल्यामुळे असे वागतात. हो करण जोहरच्या सल्ल्यानुसार अभिनय कारकीर्दीत प्रवेश केल्याने मला कोणता पश्चाताप नाही. कारण धर्मा आणि करण जोहर यांनी मला जे काही दिलं ते भाग्यवंतांनाच मिळतं”. (Janhvi Kapoor)

बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी असल्याने जान्हवीला स्टारकिडच्या मुद्द्यावरून देखील बरेचदा ट्रोल करण्यात
आले होते. नुकताच जान्हवीचा ‘मिली’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
मात्र हा चित्रपट काही विशेष कामगिरी करू शकला नाही. सध्या जान्हवीकडे ‘बावल’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस’
असे दोन बिग बजेट चित्रपट आहेत.

Web Title :- Janhvi Kapoor | janhavi kapoor opens up about trolling she faced when her first bollywoof film released

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | डॉक्टर पत्नीचे सोशल मीडियावर अकाऊंट तयार करुन पतीनेच केली बदनामी

Gondia ACB Trap | 15 हजार रुपये लाच घेताना उपविभागीय अधिकारी, शाखा अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime | …म्हणून नात जावयाने केला 74 वर्षाच्या सासूच्या खूनाचा प्रयत्न; कात्रजमधील घटना

MP Bhavana Gawali | अकोल्यातील गोंधळावर खासदार भावना गवळींनी केली तक्रार दाखल; खा. विनायक राऊत आणि आ. नितीन देशमुख यांनी चिथावल्याचा आरोप

Must Read
Related News