Janhvi Kapoor | जान्हवी कपूर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला करतेय डेट? तो व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जान्हवीचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये ती तिच्या मित्रासोबत दिसत होती. आता पुन्हा एकदा जान्हवीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये ती एक्स बॉयफ्रेंड शिखर पाहारियाबरोबर दिसत आहे. अलीकडेच हे दोघे अनेक ठिकाणी एकत्रित दिसले होते. यामुळे पुन्हा एकदा हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चां सुरू आहेत (Janhvi Kapoor).

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याच्या पार्टीतला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की जान्हवी गुलाबी रंगाच्या साडी मध्ये खूपच सुंदर दिसत आहे. ती येताच तिला घेण्यासाठी शिखर बाहेर येतो आणि दोघेही आत निघून जातात.आता या व्हिडिओ नंतर पुन्हा हे दोघे एकत्रित आल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

 

 

काही दिवसांपूर्वीच दोघांनी एकमेकांशी बोलायला सुरुवात केली होती.
आता त्यांनी पुन्हा एकदा नव्याने त्यांच्या नात्याला संधी देण्याचा विचार केला आहे असे बोलले जात आहे.
शिखर पाहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे.
सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पाहारिया यांचा तो मुलगा आहे.
जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि शिखर 2016 मध्ये एकमेकांना डेट करत होते
मात्र त्यानंतर दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या आणि आता पुन्हा एकदा हे दोघेही एकत्रित दिसत आहेत.

 

Web Title :- Janhvi Kapoor | janhvi kapoor and former cm sushirkumar shinde grandson shikhar pahariya dating each other

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kirit Somaiya | विरोधकांच्या घोटाळ्यांचा हिशोब नववर्षात चुकता करणार; किरीट सोमय्यांचा ठाकरेंना इशारा (व्हिडिओ)

Pune Crime News | धकनवडी-बालाजीनगरमध्ये टोळक्याकडून युवकावर खुनी हल्ला, करण पाटील आणि विवेक चोरगेला अटक

Alia Bhatt | आलियाच्या लेकीला मिळाली ‘ही’ खास भेटवस्तू; फोटो शेअर करत दिली माहिती