Janhvi Kapoor | जान्हवी कपूरचे साडीतले फोटो पाहून चाहते घायाळ; देसी लुकला दिला बोल्डनेसचा तडका

पोलीसनामा ऑनलाइन : बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ने 2018 मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. सुरुवातीच्या काळात जरी तिचे अभिनय कोणाला भावले नसले तरी देखील तिने आपल्या लूकने सर्वांना वेड लावले होते. जान्हवी तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या स्टायलिश लुकमुळे देखील ओळखली जाते. जान्हवीने (Janhvi Kapoor) आजवर तिच्या अदांनी सर्वांवर भुरळ पाडली आहे. नुकतेच जान्हवीने ट्रेडिशनल वेअर करत त्याला बोल्डनेसचा टच देत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

जान्हवी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे अनेक व्हिडिओज आणि फोटोज चाहत्यांसाठी शेअर करत असते. जान्हवीचे सोशल मीडियावर अनेक फॉलोवर्स देखील आहेत. जान्हवीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. जान्हवीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने डार्क चॉकलेटी रंगाचे आऊटफिट परिधान केले असून केस मोकळे सोडत नाकात नथनी देखील घातली आहे. या ट्रेडिशनल वेअरला तिने बोल्डनेसचा टच दिल्याने तिचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

जान्हवीचा (Janhvi Kapoor) हा लूक सर्वांनाच आवडल्याचे दिसत आहे.
अनेकांनी तिच्या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक केले आहे.
जान्हवी नेहमीच आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करत असते.
मागील वर्षी ‘मिली’ या चित्रपटामुळे ती चर्चेत आली होती. त्यानंतर जान्हवी सतत तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.
एवढेच नाही तर जान्हवीने अलीकडेच 65 कोटी रुपयांचे Duplex घर खरेदी केले आहे.
जान्हवीने वयाच्या 25 व्या वर्षीच कोट्यावधी रुपयांचे घर घेतले आहे.

Web Title :-  Janhvi Kapoor | janhvi kapoor gave a touch of boldness to the desi look fans were shocked to see the photos in sarees photos gallary

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrapur Accident | चंद्रपूरमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बसचा भीषण अपघात; 2 ठार, 17 जखमी

Dilip Malkhede Passed Away | अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांचे पुण्यात निधन