Janhvi Kapoor | जान्हवीच्या क्रॉप टॉपने वेधले उपस्थितींचे लक्ष; फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची प्रसिद्ध स्टार किड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते. सतत चर्चेत असणाऱ्या जान्हवीचा कमी वेळेमध्ये मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. जान्हवी कपूर हिने ‘धडक’ या चित्रपटामधून बॉलीवुडमध्ये पदार्पण (Janhvi Kapoor Bollywood Debut) केले आणि त्यानंतर ती आजपर्यंत सतत चर्चेच्या वर्तुळामध्ये राहिली आहे. सोशल मीडियावर देखील जान्हवीचे (Janhvi Kapoor) अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकतेच तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिने टाईट क्रॉप टॉप स्टाईल केला होता. तिच्या या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केले आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या रिव्हिलिंग फॅशनमुळे (Janhvi Kapoor Revealing Fashion) ओळखली जाते. सुरुवातीला साध्या लूकमध्ये दिसून येणारी जान्हवी ही आता नवनवीन हॉट लूक कॅरी करताना दिसून येते. जान्हवी ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असून ती आपले हॉट फोटोशूट (Janhvi Kapoor Hot Photoshoot) चाहत्यांसोबत शेअर करायला विसरत नाही. यावेळी ती मुंबईमधील एक इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. तिने घातलेला व्हाईट टाईट टॉप हा लक्षवेधी ठरत होता. या इव्हेंटमध्ये जान्हवी कपूरने ‘धडक’ चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक खेतान (Director Shashank Khaitan) यांच्यासोबत हजेरी लावली होती. अभिनेत्री जान्हवी कपूर हिच्या अदांवर सर्व उपस्थित फिदा झाले होते. तिने यावेळी व्हाईट कलरचा टाईट क्रॉप टॉप स्टाईल केला होता. सोबतच हाय वेस्टेट जीन्स परिधान केली होती. लाईट मेकअपसह तिने केस मोकळे सोडले होते. हाय हिल्स परिधान केलेल्या जान्हवी कपूरच्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूरचे (Janhvi Kapoor) हे मुंबईतील इव्हेंटमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट केल्या असून तिच्या चाहत्यांनी रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.
अभिनेत्री जान्हवी कपूरचा हिचा बवाल हा चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीटी वर रिलीज झाला होता.
तसेच अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये ती पुढे काम करताना दिसणार आहे. लवकरच ती ‘देवरा’ (Devara Movie),
‘दोस्ताना 2 (Dostana 2)’, ‘बॉम्बे गर्ल’ (Bombay Gir) आणि ‘जन गण मन’ (Jana Gana Mana movie)
या चित्रपटांमध्ये (Janhvi Kapoor Upcoming Movie) भूमिका साकारताना दिसणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every updateहे देखील वाचाLoan Processing Fees | ‘या’ बॅंकेने केली लोन प्रोसेसिंग फी माफ; कर्जदारांना होणार फायदाAtal Pension Yojana | अटल पेंशन सरकारी योजना रिटायरमेंटनंतर देऊ शकते दरमहा हजारो रुपये