Janhvi Kapoor | जान्हवी कपूरच्या वडिलांनी शेअर केले तिचे बेडरुम सिक्रेट, म्हणाले – ‘मी तिच्या खोलीत जातो तेव्हा…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) आगामी ‘मिली’ हा चित्रपट (Mili Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सनी कौशल (Sunny Kaushal) आणि मनोज पाहवा (Manoj Paahva) यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती खूप व्यस्त आहे. हा चित्रपट ‘हेलन’ या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवी कपूरने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma Show) हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासोबत तिचे वडील बोनी कपूरही (Boney Kapoor) उपस्थित होते. या भागात बोनी कपूर जान्हवी कपूरचे (Janhvi Kapoor) बेडरूम सिक्रेट (Bedroom Secrets) शेअर करताना दिसत आहेत. त्याचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी भागाचा प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की, बोनी कपूर म्हणाले, मी तिच्या खोलीत जातो तेव्हा सर्व कपडे विखुरलेले असतात. बाथरुममध्ये टूथपेस्ट उघडलेली असते. सुदैवाने, ती कमीतकमी फ्लश तरी करते. बोनी कपूरचं हे बोलणं ऐकून जान्हवी मोठ्याने ओरडते पापा. यामुळे शोमध्ये एकच हशा पिकतो. त्यामुळे ‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी भागात ही बाप-लेकीची जोडी धमाल करताना दिसणार आहे.

जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) चित्रपट ‘मिली’ 4 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
विशेष म्हणजे जान्हवीचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
या चित्रपटात ती आपल्या वडिलांसोबत काम करताना दिसणार आहे. तिचे वडील बोनी कपूर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. त्यामुळे जान्हवीच्या या चित्रपटाची सगळेजण उत्सुकतेने वाट बघत आहेत.

 

Web Title :- Janhvi Kapoor | janhvi kapoors father shares her bedroom secret in the kapil sharma show

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Fire News | पुण्यातील वडगाव शेरीमध्ये गोदामाला भीषण आग, सिलिंडरच्या स्फोटाने परिसर हादरला

Marriage Bank Loan | लग्न थाटामाटात करायचंय? मिळू शकते लोन, बँकेत जाण्याचीही नाही गरज, Online असं करा Apply

MNS | ’50 खोके सामना ‘OK’, शिंदे-फडणवीस सरकारच्या जाहिरातीवर मनसेचा शिवसेनेला खोचक टोला