Janhvi Kapoor Latest Movie Mr and Mrs Mahi | जान्हवी कपूर सोबत दिसला ‘हा’ मुंबई इंडियन्सचा माजी क्रिकेटर; फोटो झाले व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सुप्रसिद्ध स्टारकिड म्हणजे जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. जान्हवी (Janhvi Kapoor Latest Movie Mr and Mrs Mahi) नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेत पाहायला मिळते. तिनं शशांक खेतान (Shashank Khaitan) दिग्दर्शित ‘धडक’ (Dhadak) या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती ‘गुंजन सक्सेना (Gunjan Saxena)’ या चित्रपटामधून रसिक प्रेक्षकांना मनात चांगलीच झळकली. लवकरच ती (Janhvi Kapoor) आगामी चित्रपटामधून (Janhvi Kapoor Latest Movie Mr and Mrs Mahi) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

जान्हवी कपूर मात्र आता एका अनोख्या कारणामुळं नेटकऱ्यांच्या चर्चेत आली आहे. अलीकडेच चित्रपट निर्माता करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या एका आगामी चित्रपटाची (Janhvi Kapoor Latest Movie Mr and Mrs Mahi) घोषणा केली. या चित्रपटाचं नाव ‘मिस्टर अन्ड मिसेस माही’ असं घोषित करण्यात आलं. या चित्रपटामध्ये जान्हवी कपूर सोबतच राजकुमार राव (Rajkummar Rao) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

जान्हवीनं तिच्या सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती तिच्या आगामी चित्रपटाची तयारी करताना दिसत आहे. ‘मिस्टर अन्ड मिसेस माही’ हा चित्रपट क्रिकेट या खेळावर आधरित असून, यामध्ये तिनं या खेळाचा पूरेपूर सराव केला असल्याच दिसत आहे. तिनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती मैदानात उतरली असल्याचं दिसत असून, डोक्यावर हेल्मेट घालून ती क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज आहे. असं या शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसत आहे.

 

दरम्यान, क्रिकेटचा सराव करताना तिच्या सोबतच 2019 विश्र्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा दिग्गज खेळाडू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याच्यासोबत तिनं सराव केलाय. तिनं सराव करतानाचे काही फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘क्रिकेट कॅम्प, मिस्टर अन्ड मिसेस माही.’ शेअर केलेल्या फोटोमध्ये माजी क्रिकेटर अभिषेक नायर (Abhishek Nayar) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) हे दोघे दिसत आहे. तसेच हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे.
‘मिस्टर अन्ड मिसेस माही’ हा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी आतुर झालेले पाहायला मिळतात.

 

Web Title : Janhvi Kapoor Latest Movie Mr and Mrs Mahi | bold janhvi kapoor seen with
mumbai indians ex cricketer and india player dinesh kartik photos
went viral sparks bollywood gossips

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे, पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या