रात्री उशिरा स्टूडिओबाहेर स्पॉट झाली जान्हवी कपूर, शॉर्ट कपड्यांमध्ये दिसला तिचा ‘लूक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या फॅशनमुळे नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. फिटनेस फ्रीक असणारी जान्हवी नेहमीच जीमच्या बाहेर स्पॉट होत असते. जीम लुकमधील तिचे अनेक फोटो आतापर्यंत समोर आले आहेत.

नुकतीच ती स्टु़डिओबाहेर स्पॉट झाली होती. सध्या तिचे काही फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोत जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्लॅक क्रॉप टॉप आणि मॅचिंग शॉर्ट घातली आहे. यावेळी जान्हवीचा नो मेकअफ लुकही पाहायला मिळाला.

जेव्हा जेव्हा जान्हवी स्टुडिओच्या बाहेर स्पॉट होत असते तेव्हा तेव्हा ती हसत हसत मीडियाला पोज देत असते. जान्हवीचे हे बोल्ड अदांजातील फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांनाही जान्हवीचा हा लुक आवडला आहे. त्यांनीही जान्हवीच्या लुकचं भरभरून कौतुक केलं आहे.

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती घोस्ट स्टोरीज या वेब सीरीजमध्येही ती दिसली होती. लवकरच जान्हवी दोस्ताना 2 सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाची शुटींगही सुरू झाली आहे. याशिवाय ती रुही आफ्जा या रोमँटीक हॉरर सिनेमातही दिसेल. इतकेच नाही तर तर गुंजन सक्सेनाचा बायोपिक असेलल्या गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल या सिनेमातीही ती काम करणार आहे. याशिवाय तिच्याकडे तख्त हा सिनेमादेखील आहे.