जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) अनेकदा तिच्या फोटोशुटमुळं चर्चेचा हिस्सा बनली आहे. आपल्या बोल्डनेसमुळं तिनं अनेकदा सोशलवर अटेंशन घेतलं आहे. पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. जान्हवीनं तिच्या एका खराब डेटींगचा अनुभव शेअर केला आहे. तो कसा भीतीदायक होता हेही तिनं सांगितलं आहे. एका शोमध्ये ती बोलत होती.

जेव्हा जान्हवी कपूर सोबत झालं होतं काही भयानक

एका मुलाखतीत जान्हवीनं तिच्या डेटींग एक्सपेरियंसबद्दल सांगितलं आहे. यात तिनं तिचा भीतीदायक अनुभव सांगितला आहे. ही घटना तेव्हाची आहे जेव्हा ती कॉलेजमध्ये होती आणि डेटींगसाठी गेली होती.

जान्हवी म्हणाली, मी डेट नाही करत. डेट्सवर बाहेर नाही जात. शेवटचं जेव्हा मी हे केलं तेव्हा मी लॉस एंजलिसमध्ये कॉलेजचं शिक्षण घेत होते. तो भयानक अनुभव होता. तो चुकीचा होता. त्यानं मला काही चुकीचं बोललं होतं. तो म्हणाला चेक आणा. माझा जाण्याचा टायमिंग झाला आहे.

डेटींगबद्दल खोडकर आहे जान्हवी

करीनाच्या शोमध्येही जान्हवीनं तिच्या डेटींग लाईफबद्दल भाष्य केलं होतं. तिनं सांगितलं होतं की, ती स्वत: गोष्टी सुरू करण्यात विश्वास नाही ठेवत आणि खूप खोडकर आहे. ज्याच्यात तिला रस आहे किंवा तिच्यात ज्याला रस आहे त्यांच्यासाठी ती लहान लहान हिंट सोडत असते.

जान्हवीला आवडते डोळ्यांची मस्ती, एन्जॉय करते अटेंशन

जान्हवी म्हणाली, मी खूप खोडकर आहे. मी माझ्या हिंट देत असते. परंतु मी हे लगेच स्पष्ट करत नाही जोपर्यंत मला खात्री होत नाही की समोरचा मला लाईक करत आहे. परंतु मजा येते ना असं डोळ्यांच्या डोळ्यात बोलायला. मी अटेंशन एन्जॉय करते, मी कधीच फर्स्ट मुव्ह नाही केला. या बाबतीत मी थोडी फट्टू आहे.

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती घोस्ट स्टोरीज या वेब सीरीजमध्येही ती दिसली होती. लवकरच जान्हवी दोस्ताना 2 सिनेमात दिसणार आहे. याशिवाय ती रूही अफजाना या सिनेमात राजकुमार रावसोबत काम करताना दिसणार आहे. अलीकडेच जान्हवीनं गुंजन सक्सेनाचा बायोपिक असेलला गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल या सिनेमातीही काम केलं आहे. तिच्यासोबत पंकज त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. याशिवाय तिच्याकडे करण जोहरचा मल्टीस्टारर तख्त हा सिनेमादेखील आहे. आता ती गुड लक जेरी या सिनेमावर काम करत आहे.