डेटिंगबाबत काय विचार करते जान्हवी कपूर, करीनाच्या शो मध्ये केला खुलासा

नवी दिल्ली : बॉलीवुड अभिनेत्री जान्हवी कपूरने (janhvi kapoor) करीना कपूर खानचा चॅट शो What Women Want मध्ये आपल्या डेडिंग लाइफबाबत अनेक गोष्टी उघड केल्या. जान्हवीने (janhvi kapoor) सांगितले की, जर तिला कुणी आवडत असेल तर ती कधीही स्वता त्याच्याकडे पहिले पाऊल टाकत नाही. तिने म्हटले की, ती याबाबतीत खुप लाजाळू आहे, यासाठी ती प्रयत्न करते की, समोरच्यासाठी हिंट सोडावी.

जान्हवीने म्हटले की, तिला समोरच्या मध्ये रस आहे ही गोष्ट ती तोपर्यंत समोर येऊ देत नाही जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही की समोरचा सुद्धा तिच्याबाबत हाच विचार करतो. अभिनेत्री म्हणाली, मला डोळ्यांची भाषा आवडते. करीना कपूर खानचा शो मध्ये जान्हवी म्हणाली, खुप मजा येते ना डोळ्यांची भाषा बोलताना.

काही काळापासून जान्हवी बॉलीवुड अभिनेता कार्तिक आर्यनसोबत शुटिंग करण्यात बिझी आहे. दोघे दोस्ताना-2 चित्रपटात एकत्र दिसतील. दोघांनी काही दिवसांपूर्वी सोबतच गोव्याज सुटी साजरी केली होती. यानंतर त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा जास्तच सुरू झाली. मात्र, दोघांपैकी कुणीही अजूनपर्यंत याबाबत स्पष्ट सांगितलेले नाही.

गुड लक जैरी मध्ये दिसणार
याशिवाय जान्हवी कपूर पंजाबमध्ये फिल्म गुड लक जैरी ची शुटिंग करत आहे. याच आठवड्यात चित्रपटाचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेयर करण्यात आला होता. छायाचित्रात जान्हवी ब्लू कलरच्या बांधणी सलवार कमीजमध्ये दिसली होती आणि सोबतच तिने ऑरेंज कलरचा दुप्पटा घेतला होता. मिनिमम मेकअप आणि बांधलेल्या केसांचा तिचा लुक फॅन्सला खुप पसंत आला.