आई ‘श्रीदेवी’बद्दल जान्हवी कपूरचं मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच आपल्या फोटोंमुळे चर्चेत असते. धडक सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणारी जान्हवी सध्या आपल्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. जान्हवीनं नुकतंच आपल्या आई-वडिलांबाबत मोठं विधान केलं आहे. त्यामुळे जान्हवी सध्या चर्चेचा हिस्सा बनताना दिसत आहे.

जान्हवी म्हणाली, “मी याकडे एक जबाबदारी म्हणून पाहते. माझ्या कुटुंबाला आणि माझ्या आईला चाहत्यांचं खूप प्रेम मिळालं आहे. कारण मलाही असंच प्रेम मिळालं आहे. मला ते सिद्ध करण्यासाठी स्वत:च्या दमावर अधिक मेहनत करावी लागणार आहे. मलाही सिद्ध करावं लागणार आहे की, मी या प्रेमासाठी पात्र आहे”

View this post on Instagram

👻

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

जान्हवीला वाटतं की ही तिची जबाबदारी आहे की, तिनं स्टारडमपेक्षा तिच्या आईसोबतच्या भावनांना पूर्ण करावं. पुढे बोलताना जान्हवी म्हणाली, “मी माझ्या आईपेक्षा मोठी स्टार बनवण्याचा विचार करत नाहीये. मला नाही वाटत की, हे कोणाला शक्य आहे. मी तिच्यापेक्षा वेगळी आहे. कामप्रति आम्हाला वाटणारी भावना मात्र समान आहे. आईनं ज्या प्रमाणे मेहनत घेतली आहे ती माझ्या डिएनए आणि कंडिशनिंगमध्येही सामावलेली आहे. मी स्टारडमसाठी मरत नाही. मी काही तरी चांगलं करण्यासाठी आले आहे.”

View this post on Instagram

🧚‍♀️❄️

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती दोस्ताना 2 सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाची शुटींगही सुरू झाली आहे. याशिवाय ती रुही आफ्जा या रोमँटीक हॉरर सिनेमातही दिसेल. इतकेच नाही तर तर गुंजन सक्सेनाचा बायोपिक असेलल्या गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल या सिनेमात आणि घोस्ट स्टोरीज या वेब सीरीजमध्येही ती दिसणार आहे.

View this post on Instagram

Still fighting jet lag tbh….✨

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

 

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like